शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

नागपुरातील ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ मध्ये संत्रा उत्पादन ते निर्यात यावर होणार सर्वंकष चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 10:30 IST

१६, १७ व १८ डिसेंबर रोजी ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ चे आयोजन करण्यात येत आहे. या फेस्टिव्हलमध्ये संत्र्याविषयीचे देश-विदेशातील तज्ज्ञ, उत्पादक सहभागी होणार असून या क्षेत्रात रोजगार आणि पर्यटनाची संधी, संत्र्याचे मार्केटिंग यावर विचारांचे आदानप्रदान होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग तयार केला जाणार आहे.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ होणार सहभागीविविध चर्चासत्रातून मिळणार आॅरेंज व्हॅल्यू चेनची माहितीप्रश्नोत्तरे, प्रात्यक्षिक व फळ प्रदर्शनाचे आयोजन

आॅनलाईन लोकमतनागपूर : १६, १७ व १८ डिसेंबर रोजी ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ चे आयोजन करण्यात येत आहे. या फेस्टिव्हलमध्ये संत्र्याविषयीचे देश-विदेशातील तज्ज्ञ, उत्पादक सहभागी होणार असून या क्षेत्रात रोजगार आणि पर्यटनाची संधी, संत्र्याचे मार्केटिंग यावर विचारांचे आदानप्रदान होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग तयार केला जाणार आहे. या महोत्सवात संत्र्याची लागवड ते निर्यातीच्या सर्वंकष विषयावर चर्चा होणार असून प्रश्नोत्तरे, प्रात्यक्षिक व फळ प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.शनिवारी १६ डिसेंबर रोजी उद्घाटनीय सत्रानंतर कवी सुरेश भट सभागृहात द्वितीय सत्रात दुपारी २ ते २.३० वाजेपर्यंत चर्चासत्र व त्यानंतर दुपारी २.३० वाजतापासून आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये दुपारी २.३० ते ३.१५ यादरम्यान इस्रायलचे तज्ज्ञ सिगालित बेरेन्झॉन हे ‘तोडणीनंतरची संत्रा प्रक्रिया : शेतीतून थाळीपर्यंत’ या विषयावर मार्गदर्शन करतील. यानंतर दुपारी ३.१५ ते ३.३० वाजतापर्यंत थिंपू, भूतानच्या कृषी व वनमंत्रालयाचे जिग्मे तेनझिन हे संत्रा उत्पादकांना माहिती देतील.दुपारी ३.३० वाजतापासून सायंकाळी ५ वाजतापर्यंत तांत्रिक सत्रामध्ये ‘संत्रा लागवडीमधील समस्या आणि अपेक्षा’ या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत ‘भारतातील संत्रा लागवड : भविष्यातील वाटचाल’ या विषयावर केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था (सीसीआरआय)चे संचालक डॉ. एम.एस. लदानिया हे तांत्रिक सादरीकरण करतील. यासोबतच सीसीआरआयचे वैज्ञानिक डॉ. ए. के. श्रीवास्तव हे ‘संत्र्यातील पौष्टिकत्व व्यवस्थापनातील समस्या आणि अपेक्षा’ या विषयावर सादरीकरण करणार आहेत. यानंतर सीसीआरआयच्या वैज्ञानिक डॉ. एन. विजयकुमारी ‘शुट-टिप-ग्रॅफ्टींग आणि इतर टिश्यू (उती) कल्चर तंत्र’ या विषयावर तांत्रिक सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन करतील. यानंतर ‘आधुनिक नर्सरी व्यवस्थापन तंत्र’ या विषयावर सीसीआरआयचे वैज्ञानिक डॉ. आय.पी. सिंह हे सादरीकरण करणार आहेत.जागतिक संत्रा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ पासून प्रथम सत्राला सुरुवात होईल. सकाळी ११ वाजता आॅरेंज ग्रोअर असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष पी. जी. जगदीश हे संत्रा शेतीविषयक आढावा घेतील. सकाळी ११.१० ते ११.२० यादरम्यान सीसीआरआयचे संचालक डॉ. एम. एस. लदानिया हे संकल्पना संदेश मांडतील. सकाळी ११.२० ते १२.२० वाजतादरम्यान ‘संत्रा शेती : रिटेल व्हॅल्यू चेन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रामध्ये सहभागी तज्ज्ञ आपले विचार मांडतील. यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी आणि बागायत शेती विभागाचे प्रधान सचिव बिजय कुमार, विभागीय आयुक्त अनुप कुमार, यूपीएलचे सीओओ सागर कौशिक, लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एम. एस. लदानिया, नॅशनल सेंटर फॉर कोल्ड चेन डेव्हलपमेंटच्या मानव संसाधन व समन्वय विभागाचे प्रमुख अंशुमन सिद्धांता, फ्युचर सप्लाय चेन सोल्युशन लिमिटेडच्या तापमान नियंत्रण व पुरवठा विभागाचे बिझनेस हेड आनंद सेन हे तज्ज्ञ मान्यवर सहभागी होणार आहेत. चर्चासत्रामध्ये तज्ज्ञांकडून ‘संत्रा शेतीसाठी वर्तमान शासनाचे समर्थन आणि औद्योगिक उपक्रम, शीतगृहे, पॅकेजिंग सुविधा आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेचा अभाव, तोडणीनंतरचे व्यवस्थापन, तंत्रज्ञानातून संत्रा शेतीची प्रगती’ या मुख्य बिंदूंना अनुसरून चर्चा केली जाईल. यानंतर दुपारी दुपारी १२.२० ते १२.३० वाजता राष्ट्रीय सहकारिता विकास महामंडळाचे डॉ. खाडे यांच्याद्वारे सादरीकरण करण्यात येईल. भोजन अवकाशानंतर दुपारी २ वाजता लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा मार्गदर्शन करतील. यानंतर दुपारी २.१० वाजता भारतीय लिंबूवर्गीय फलोत्पादन संस्थेतर्फे डॉ. श्याम सिंह सर्वोत्कृष्ट लिंबूवर्गीय फळ उत्पादन पुरस्काराचे वितरण केले जाईल. यामध्ये ‘बेस्ट सायट्रस ग्रोअर आॅफ इंडिया’चे पाच पुरस्कार प्रदान करण्यात येतील. दुपारी २.२० वाजता केंद्र शासनाचे कृषी व कुटुंब कल्याण मंत्री राधामोहन सिंह मार्गदर्शन करणार आहेत.दुपारी २.३५ वाजता तांत्रिक सेमिनारला सुरुवात होईल. ‘संत्रा लागवडीमधील समस्या आणि अपेक्षा’ या विषयावर होणारे हे सेमिनार सत्र सायंकाळी ४.३५ वाजतापर्यंत चालेल. याअंतर्गत आयसीएआर-सीसीआरआयचे वैज्ञानिक डॉ. ए.डी. हुच्छे यांच्या ‘संत्रा लागवडीतील आधुनिक कृषी तंत्रज्ञान’ या विषयावरील सादरीकरणाद्वारे सत्राला सुरुवात होईल. यानंतर आयसीएआर-सीसीआरआयचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. डी. के. घोष हे ‘संत्रा मशागतीदरम्यान विषाणू व विषाणूजन्य रोगांचे व्यवस्थापन’ या विषयावर तांत्रिक सादरीकरण करतील. याच सत्रात ‘संत्रा मशागतीदरम्यान बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांचे व्यवस्थापन’ या विषयावर डॉ. ए. के. दास, वैज्ञानिक, आयसीएआर-सीसीआरआय यांचे सादरीकरण होणार आहे. याशिवाय ‘संत्रा लागवडीदरम्यान कीड व्यवस्थापनाचे नवे धोरण’ या विषयावर डॉ. सी. एन. राव, वैज्ञानिक, आयसीएआर- सीसीआरआय, आयसीएआर-सीसीआरआयचे वैज्ञानिक डॉ. पी.एस. शिरागुरे हे ‘संत्र्याच्या जलव्यवस्थापनातील आव्हाने आणि विकास’ या विषयावर आणि सीसीआरआयचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. दिनेश कुमार हे ‘तोडणीनंतरचे व्यवस्थापन आणि संत्रा पिकाच्या प्रक्रियेतील उपलब्ध पर्याय’ या विषयावर तांत्रिक सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन करणार आहेत.१८ डिसेंबर रोजी महोत्सवाच्या अंतिम दिवसाचे कार्यक्रम सकाळी ९ वाजता नोंदणीद्वारे सुरू होणार आहेत. प्रथम सत्रात सकाळी १०.३० ते १२ वाजतादरम्यान संत्रा उत्पादक आणि बँकर्स यांच्या भेटीचा (एसएलबीसी) कार्यक्रम होईल. दुपारी १२ ते १ वाजतापर्यंत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.ए. निंबाळकर हे परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी महा आॅरेंजचे चेअरमन अनंत घारड, आॅरेंज ग्रोअर असोसिएशन आॅफ इंडिया(ओजीए)चे कार्यकारी अध्यक्ष अमोल तोटे, एपीईडीएचे सहायक महाव्यस्थापक प्रशांत वाघमारे, फूड सिक्युरिटी, अ‍ॅग्रीबिझनेस, पॉलिसी अ‍ॅन्ड प्रोजेक्ट, यूपीएलचे उपाध्यक्ष आणि प्रमुख विजय सरदाना, ताज फ्रूट कंपनीचे संचालक ताज खान तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे या मान्यवरांचा सहभाग असणार आहे.दुपारी २.१५ ते २.३० वाजतापर्यंत भू-विज्ञान मंत्रालयातर्फे सादरीकरण केले जाणार आहे. यानंतर दुपारी २.३० ते २.४५ वाजतापर्यंत ई-नाम(नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केट)तर्फे सादरीकरण केले जाणार आहे.दुपारी २.४५ वाजतापासून तांत्रिक सत्राला सुरुवात होणार आहे. ‘भारतातील संत्रा उद्योग’ या विषयांतर्गत सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. तांत्रिक सत्र सायंकाळी ४.३० पर्यंत चालेल. याअंतर्गत लुधियाना (पंजाब) येथील फळ विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. एमआयएस गील हे ‘पंजाबमधील किननॉउ उद्योग’ या विषयावर तांत्रिक सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन करतील. भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयांतर्गत महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थेच्या उपसंचालिका डॉ. प्रगती गोखले या ‘मेरा मोबाईल मेरा मार्केट’ या विषयावर सादरीकरण करतील. याशिवाय स्वीट आॅरेंज रिसर्च स्टेशन, बदनापूर जिल्हा जालनाचे प्रमुख डॉ. एम.बी. पाटील हे ‘महाराष्ट्रतील गोड संत्रा लागवडीच्या अपेक्षा’ या विषयावर सादरीकरण करतील. एआयसीआरपी आॅन फ्रूट, संत्रावर्गीय संशोधन केंद्र, तिरुपती, आंध्रप्रदेशचे प्रमुख आणि प्रधान वैज्ञानिक डॉ. के. टी. व्यंकटरामन हे ‘आंध्रप्रदेशामध्ये गोड संत्रा लागवडीच्या अपेक्षा’ या विषयावर सादरीकरण करतील. यादरम्यान ‘नेह भागात खासी संत्रा लागवड’ या विषयावर मिझोरमच्या फलोत्पादन विभागाद्वारे सादरीकरण केले जाणार आहे. ‘उत्कृष्ट लिंबुवर्गीय फळांच्या केंद्राची उपलब्धता’ या विषयावर फलोत्पादन विभाग प्रमुख, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाच्या फलोत्पादन विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. एम. पंचभाई हे तांत्रिक सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन करतील. शेवटी आयआयएचआर, बंगळुरुचे वैज्ञानिक डॉ. पी. त्रिपाठी हे ‘दक्षिण भारतातील कुर्ग संत्रा उद्योग’ या विषयावर सादरीकरण करणार आहेत. सायंकाळी ४.३० वाजता समारोपीय संदेशाद्वारे या जागतिक महोत्सवाचा समारोप होणार आहे.

 

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूर