शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्ह : नागपुरात शहरभर संगीताची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 23:57 IST

उपराजधानीत सुरू असलेल्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल प्रत्येक वर्गासाठी एक आगळीवेगळी पर्वणी घेऊन आला आहे. फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी शहरातील विविध भागांमध्ये लाईव्ह म्युझिक कन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील रस्त्यावर युवा गायक आणि वादक कलावंतांनी एकाहून एक सरस गीतांचा नजराणा सादर केला. शहरातील रस्त्यावर सुरू असलेली संगीताची धूम बघून युवावर्गामध्येही उत्साह संचारला होता. 

ठळक मुद्देगायक कलावंतांकडून उत्स्फू र्त गीतांचा नजराणा : युवकांनी दाखविला उत्साह विद्यापीठ मैदान, वर्धमाननगर, चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कसह फुटाळा चौपाटीवर आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत सुरू असलेल्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल प्रत्येक वर्गासाठी एक आगळीवेगळी पर्वणी घेऊन आला आहे. फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी शहरातील विविध भागांमध्ये लाईव्ह म्युझिक कन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील रस्त्यावर युवा गायक आणि वादक कलावंतांनी एकाहून एक सरस गीतांचा नजराणा सादर केला. शहरातील रस्त्यावर सुरू असलेली संगीताची धूम बघून युवावर्गामध्येही उत्साह संचारला होता. 

शहरातील अमरावती रोडवरील विद्यापीठाचे मैदान, वर्धमाननगर परिसरातील पूनम बाजार, चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क व फुटाळा चौपाटीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलनिमित्त तयार करण्यात आलेल्या ट्रकवर म्युझिक सिस्टम आणि वाद्यासोबत गायक आणि वादकांनी आकर्षक गीतांचा नजराणा सादर केला. त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांनी आपली वाहने थांबवून कार्यक्रमाचा आनंद घेतला. विशेष म्हणजे युवकांमध्ये या लाईव्ह कन्सर्टचा चांगलाच उत्साह दिसून आला. विद्यापीठाच्या मैदानावर व फुटाळा चौपाटीवर गायक शादाब यांच्यासह ऑक्टोपॅडवादक नंदू गोहाणे, की-बोर्डवर विक्की निमजे यांनी आपल्या गीतांनी परिसराचा माहोल संगीतमय बनविला. यात शादाबने ‘हम तेरे बिन अब रह नहीं सकते...’ ‘चंदा मेरे आ मेरे आ...’ या गीतांसह प्रचलित गीतांबरोबरच काही जुन्या गीतांचेही सादरीकरण केले. कलावंतांकडून होत असलेल्या गीतांच्या सादरीकरणावर युवकांनीही चांगलाच ठेका धरला. फुटाळा तलावावर झालेल्या लाईव्ह कन्सर्टमध्ये युवक-युवतींनी गर्दी केली होती. 
 वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलबाबत युवकांमध्ये कुतूहलवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलची शहरभर धूम सुरू आहे. कुठे प्रबोधनाचे कार्यक्रम होत असून, कुठे मनोरंजनात्मक कार्यक्रम सुरू आहे. लाईव्ह म्युझिक कन्सर्टमुळे फेस्टिव्हलच्या आयोजनात चांगलीच रंगत आली. कार्यक्रमाच्या स्थळावर आयोजकांनी फेस्टिव्हलसंदर्भात विचारणा केली. संत्र्याच्या थीमवर सुरू असलेले हे रंगतदार आयोजनाचे युवकांनी कौतुक केले.