शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : स्वादिष्ट संत्र्याच्या हलव्याने वाढविला गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 22:12 IST

नागपुरी संत्र्यापासून तयार होणाऱ्या हलव्याचा स्वादिष्ट स्वाद चाखण्यासाठी नागपूरकर सज्ज होते. विशेषत: महिलांसह पुरुषांनाही रेशीमबाग येथे आयोजित वर्ल्ड  ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी दुपारपासूनच गर्दी केली होती. नामांकित शेफ विष्णू मनोहर यांनी संत्री आणि सालीचा उपयोग करून ७०० पेक्षा जास्त किलो हलवा तयार करून सर्वांची मने जिंकली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे ‘हलव्या’ने स्वागतविक्रम शेतकऱ्यांना समर्पित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरी संत्र्यापासून तयार होणाऱ्या हलव्याचा स्वादिष्ट स्वाद चाखण्यासाठी नागपूरकर सज्ज होते. विशेषत: महिलांसह पुरुषांनाही रेशीमबाग येथे आयोजित वर्ल्ड  ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी दुपारपासूनच गर्दी केली होती. नामांकित शेफ विष्णू मनोहर यांनी संत्री आणि सालीचा उपयोग करून ७०० पेक्षा जास्त किलो हलवा तयार करून सर्वांची मने जिंकली. सर्वांनी स्वादिष्ट हलव्याचा स्वाद घेऊन आनंद व्यक्त केला आहे. संत्र्यापासून हलवा तयार करता येऊ शकतो, याबद्दल विष्णू मनोहर यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले. या निमित्ताने त्यांच्या जागतिक विक्रमाच्या यादीत आणखी एक भर पडली. हा विक्रम शेतकरी बांधवांना समर्पित केल्याची प्रतिक्रिया विष्णू मनोहर यांनी दिली.विष्णू मनोहर यांनी संत्र्यापासून हलवा तयार करण्याची प्रक्रिया दुपारी ४ वाजता सुरू केली. एक-एक वस्तू १२० किलो वजनाच्या अ‍ॅल्युमिनियमच्या कढईत टाकत असताना उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह होता. हलवा तयार करण्यासाठी २५०० संत्री, ५० किलो रवा, ५० किलो साखर, १५० किलो  ऑरेंज क्रॅश (साखर व संत्र्याचा रसापासून तयार केलेला पाक), ५० किलो शुद्ध तूप, ५० लिटर दूध, १० किलो काजू आदी सामग्रीचा उपयोग करण्यात आला. दीड तासानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास हलवा तयार झाला. त्यावेळी मंडपात हलव्याचा सुवास दळवळत होता. प्रत्येकजण चव चाखण्यासाठी आतूर होता. यादरम्यान सर्वांना हलवा तयार करण्याची प्रक्रिया मनोहर यांनी महिलांना समजावून सांगितली. संत्र्याच्या उपयोग करून चविष्ट हलवासुद्धा तयार होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली. त्यावेळी उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

अशा पाककृतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार : विष्णू मनोहरमहिलांनी संत्र्याचा जास्तीत जास्त उपयोग करून पाककृती तयार कराव्यात. यामुळे संत्र्याची विक्री वाढले आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच भर पडेल. संत्र्याच्या सालीपासूनही विविध पदार्थ तयार करता येतात. अशा इव्हेंटमुळे लोकांमध्ये उत्साह निर्माण होतो. या उपक्रमासाठी विष्णू मनोहर यांची २५ जणांची चमू कार्यरत होती. त्यांना सखी मंचच्या सदस्या, विजय जथे, प्रफुल्ल देशकर, प्रवीण सिंग, अश्विन ढोमणे, सुचिता सहस्त्रभोजनी, अपर्णा मनोहर, दिपाली ढोमणे, वसुंधरा मनोहर, तनुजा मनोहर यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरVishnu Manoharविष्णु मनोहर