शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक परिचारिका दिन; तुटपुंज्या पगारावर मानावे लागते समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 10:18 IST

खासगी इस्पितळांमधील परिचारिकांचे जीवन कष्टमय, दु:खप्रद आहे. खासगी रुग्णालयांमध्ये अद्यापही किमान वेतन कायदा लागू झाला नसल्याने तुटपुंज्या पगारात परिचारिका काम करीत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देखासगी परिचारिकांना कधी मिळणार न्याय?किमान वेतन कायद्यापासून परिचारिका दूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रुग्णांवर मायेची फुंकर घालून त्यांची अहोरात्र सेवा करणाऱ्या विशेषत: खासगी इस्पितळांमधील परिचारिकांचे जीवन कष्टमय, दु:खप्रद आहे. खासगी रुग्णालयांमध्ये अद्यापही किमान वेतन कायदा लागू झाला नसल्याने तुटपुंज्या पगारात परिचारिका काम करीत असल्याचे चित्र आहे. येथे कायद्याचे सरंक्षण नाही. नोंदणीकृत अर्हता नसल्याने त्यांना इतरांप्रमाणे मान-सन्मान मिळत नाही. कामाच्या ठिकाणी डॉक्टर, कम्पाऊंडर, कधी कधी रुग्णांकडूनही शारीरिक, मानसिक त्रासाला त्यांना सामोर जावे लागते. एकूणच रुग्णसेवेला सुखापेक्षा दु:खाची झालर अधिक असल्याचे चित्र उपराजधानीतील आहे.आधुनिक नर्सिंगच्या जनक फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा १२ मे रोजी जन्मदिन. त्यांचा जन्मदिन हा जागतिक ‘परिचारिका दिन’ म्हणून दरवर्षी वैद्यकीय क्षेत्रात साजरा केला जातो. परंतु आजही खासगी परिचारिकांच्या समस्यांचे निराकरण झालेले नसल्याचे वास्तव आहे.बाळाचा जन्म झाल्यावर सर्वप्रथम तळहातावर सुरक्षित उचलून घेणारी परिचारिका असते. आईच्याही आधी, बाळाला सर्वप्रथम न्हाऊ घालणे स्वच्छ करणे ही सगळी सेवा परिचारिकाच करते, नंतर जन्मभर रु ग्णांना हीच परिचारिका अखंड सेवा देत असते. यातना आणि वेदनांनी तळमळणाऱ्या रु ग्णांची शुश्रूषा करणारी, धीर देणारी ती देवदूतच असते.मात्र त्यांच्या समस्यांकडे विशेषत: काही खासगी रुग्णालयात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. बदलत्या काळानुसार खासगी इस्पितळांमधील परिचारिकांना भेडसावणाऱ्या समस्यांमध्येही वाढ झाली आहे. शहरात अडीचशे मोठे इस्पितळ आहेत. यात साधारण बाराशे परिचारिका कामाला आहेत. परंतु यातील बहुसंख्य परिचारिका किमान वेतन कायदा लागू नसल्याने तुटपुंज्या पगारात काम करीत आहे. कायद्याचं संरक्षण नसल्याने अपमानांचे डोंगरच घेऊन त्या जगत आहेत. ग्रामीण भागात त्यांच्यावर लसीकरण, प्रसूती, कुटुंबकल्याण यासारख्या कामांचा बोजा टाकला जात आहे. तरीही एखाद्या व्रतस्थाप्रमाणे परिचारिका आपली भूमिका बजावत आहेत. स्वत:चं दु:ख विसरून रुग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल