शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक संग्रहालय दिन; कुठे ‘ऑनलाईन’ चित्रकला तर कुठे ‘व्हर्चुअल टूर’ची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 09:20 IST

देशात सुरू असलेल्या टाळेबंदीमध्येच यंदा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा केला जात आहे. त्याअनुषंगाने शहरातील विविध संग्रहालयांद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कुठे ‘ऑनलाईन’ चित्रकला स्पर्धा तर कुठे ‘व्हर्च्युअल टूर’ची तयारी केली जात आहे.

ठळक मुद्देशहरात तीन प्रमुख संग्रहालये आहेत. एक सिव्हील लाईन्स येथील मध्यवर्ती संग्रहालय, दुसरे सेमिनरी हिल्स येथील जीएसआय म्युझियम आणि तिसरे मोतीबाग येथील नॅरोगेज रेल्वे संग्रहालय. मध्यवर्ती संग्रहालयातर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सैयद मोबीनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात सुरू असलेल्या टाळेबंदीमध्येच यंदा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा केला जात आहे. त्याअनुषंगाने शहरातील विविध संग्रहालयांद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कुठे ‘ऑनलाईन’ चित्रकला स्पर्धा तर कुठे ‘व्हर्च्युअल टूर’ची तयारी केली जात आहे. या साऱ्या आयोजनांमध्ये टाळेबंदीच्या नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजीही घेतली जात आहे.शहरात तीन प्रमुख संग्रहालये आहेत. एक सिव्हील लाईन्स येथील मध्यवर्ती संग्रहालय, दुसरे सेमिनरी हिल्स येथील जीएसआय म्युझियम आणि तिसरे मोतीबाग येथील नॅरोगेज रेल्वे संग्रहालय. मध्यवर्ती संग्रहालयातर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जीएसआय संग्रहालयात आगंतुकांसाठी थर्मल स्कॅनर, हॅण्ड सॅनिटायझरीसारख्या सजगता राखणाऱ्या गोष्टींचा वापर करण्यात येत आहे तर नॅरोगेज रेल्वे संग्रहालयाच्या वतीने व्हर्च्युअल टूरची व्यवस्था करण्यात येत आहे.भेट देण्याची इच्छा असणाऱ्यास परवानगी टाळेबंदीमुळे संग्रहालय आगंतुकांसाठी बंदच आहे तरी देखील संग्रहालय दिनाच्या पार्श्वभूमीवर जीएसआय संग्रहालय बघण्याची कुणाची इच्छा असेल तर त्यांना परवानगी देण्यात येईल. यासाठी भेट देणाऱ्यांना द्वारावरच थर्मल स्कॅनर मशीनमधून जावे लागेल आणि जागोजागी हॅण्ड सॅनिटायर देखील ठेवण्यात आले आहे. टाळेबंदी असली तरी कार्यालयातील कर्मचारी व सफाईकर्मी नियमित येत आहेत. त्यामुळे संग्रहालयाचे हाऊसकिपिंग व मेन्टेनन्स सांभाळले जात आहे. परंतु, कॉलेज, शाळेचे विद्यार्थी, ऑफिशियल पर्सन्ससाठी भूमी संवाद मात्र बंद ठेवण्यात आले आहे.- विशाल साखरे, डायरेक्टर, जीएसआयनॅरोगेज रेल्वे म्युझियमतर्फे व्हर्च्युअल टूरटाळेबंदीमुळे सध्या सर्वच बंद असले तरी भविष्यात प्रत्येक जण घरी बसून नॅरोगेज रेल्वे म्युझियमचे ‘व्हर्च्युअल टूर’ करू शकणार आहे. रेल्वे बोर्डाने यासाठी मार्गदर्शिका जारी केली होती आणि म्युझियममधील फोटो व डेटा मागविला होता. ही प्रक्रिया पार पडली आहे. सध्या म्युझियममध्ये केवळ ‘हाऊसकिपिंग’ व ‘मेन्टेनन्स’चे काम सुरू आहे.ऑनलाईन चित्रकला स्पर्धापाचवी ते दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घरूनच ‘ऑनलाईन’ चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ऐतिहासिक स्मारक, प्रतिमा, इतिहास व संस्कृतिक संबंधित विषयांवर ही स्पर्धा असणार आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर ही चित्रे प्रत्यक्ष संग्रहालयात पोहोचवायची आहेत. संग्रहालय सर्वसामान्यांसाठी बंद असले तरी कार्यालय सुरू आहे आणि साफसफाई केली जात आहे.- जया वाहणे, क्युरेटर, सेंट्रल म्युझियम 

 

टॅग्स :Socialसामाजिक