शहरं
Join us  
Trending Stories
1
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
2
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
3
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
4
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
5
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
6
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
7
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
8
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
9
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
10
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
11
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
12
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
13
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
14
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
15
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
16
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
17
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
18
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
19
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
20
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव

जागतिक होमिओपॅथी दिन; अ‍ॅडव्हान्स होमिओपॅथी ‘स्टेम सेल्स’सारखीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 10:44 IST

होमिओपॅथी उपचारपद्धती मनोरचना व मनोकार्याशी जवळीक साधते. यामुळे ही पॅथी आजाराला बरे करीत नाही तर आजारी रुग्णाला बरे करते. असा सूर, होमिओपॅथी तज्ज्ञाचा आहे.

ठळक मुद्देडॉक्टरांचा दावाअनेक दुर्धर आजारांवर यशस्वी उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या आजारावर कोणतेही उपचार नाहीत, तो आजार ‘स्टेम सेल्स’च्या माध्यमातून बरा होण्याची शक्यता असते, त्याचप्रमाणे आता ‘अ‍ॅडव्हान्स होमिओपॅथी’मध्येही कुठल्याही असाध्य आजारावर यशस्वी उपचार शक्य झाले आहेत. होमिओपॅथी उपचारपद्धती मनोरचना व मनोकार्याशी जवळीक साधते. रुग्णाच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करते. त्याच्या वागणूक व व्यक्तिमत्त्वामधील सूक्ष्म बदल अनुभवून योग्य औषधांची निवड करते. यामुळे ही पॅथी आजाराला बरे करीत नाही तर आजारी रुग्णाला बरे करते. असा सूर, होमिओपॅथी तज्ज्ञाचा आहे. जागतिक होमिओपॅथी दिनाच्या पूर्वसंध्येवर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

केवळ सर्दी, खोकल्यापुरतेच मर्यादित नाही-डॉ. चिमथानवालाडॉ. आदिल चिमथानवाला म्हणाले, होमिओपॅथी केवळ सर्दी, खोकला व त्वचारोग या आजारांसाठीच मर्यादित नाही. हृदयरोग, उच्चरक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, व्यंध्यत्व, स्तनाचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग, ब्रेन ट्युमर, अस्थमा, थायरॉईड यासारख्या दुर्धर आजारांवरही होमिओपॅथीमध्ये उपचार आहेत.

अयोग्य जीवनशैलीच्या आजारांवरही उपचार-डॉ. धमगायेडॉ. सचिन धमगाये म्हणाले, अयोग्य जीवनशैली, तणाव, औषधांचा अधिक वापर, रोगप्रतिबंधात्क लसीचा अधिक वापर, आहाराची चुकीची पद्धत आदींमुळे विविध आजाराच्या विळख्यात व्यक्ती सापडत आहे. यावर ‘मॉडर्न होमिओपॅथी’ वरदान ठरत आहे. विशेषत: लहान मुलांवर होमिओपॅथीच्या औषधोपचाराचा चांगला प्रभाव दिसून येत आहे. मुलींमध्ये वाढत असलेला ‘पीसीओडी’ आजारावरही होमिओपॅथीमध्ये औषधोपचार आहे.

अ‍ॅलर्जीवर प्रभावी उपचार -डॉ. सातपुतेडॉ. यशस्वी सातपुते म्हणाल्या, मॉडर्न होमिओपॅथीमुळे अनेक आजार बरे होताना दिसून येत आहे. परिणामी, रुग्णांचा विश्वास या पॅथीवर दिवसेंदिवस वाढत आहे. महत्त्वाचे म्हणजे, विविध अ‍ॅलर्जीवर दुसऱ्या पॅथीच्या उपचारानंतरही बरे न झालेले रुग्ण होमिओपॅथीने बरे होत आहे. आता होमिओपॅथीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याने याचा फायदा रुग्णांना होत आहे.

आजाराचे मूळ शोधून उपचार-डॉ. पाटीलडॉ. मनीष पाटील म्हणाले, होमिओपॅथीमध्ये आजाराचे मूळ शोधून त्यावर उपचार केला जातो. यामुळे आजार समूळ नष्ट होण्यास मदत होते. दुर्दैवाने लोक होमिओपॅथीकडे तेव्हाच जातात जेव्हा गंभीर समस्या आणखी जुनी झालेली असते. साहजिकच अशा प्रकरणांमध्ये उपचार करण्याला कालावधी जास्त लागतो आणि लोक होमिओपॅथी तेव्हा स्वीकारतात जेव्हा बाकी उपचार पद्धती अयशस्वी होते. असे असलेतरी अनेक दुर्धर आजाराचे रुग्ण होमिओपॅथीने बरे झाले आहेत.

होमिओपॅथी काळाची गरज-डॉ. व्यवहारेडॉ. प्रसाद व्यवहारे म्हणाले, लक्षणाची अनुपस्थिती म्हणजे आरोग्य नव्हे , तर आपल्या शरीरात रोग उत्पन्न करू शकणाऱ्या कारणांचा शोध व त्याचे समूळ उच्चाटन म्हणजे खरे आरोग्य आणि या विचाराचा मागोवा घेणारे शास्त्र म्हणजे होमिओपॅथी. रोगाला नव्हे तर रोगी ला ठीक करते म्हणून अनेक जुनाट व अवघड आजार होमिओपॅथीमुळे बरे होतात. ही सम चिकित्सा पद्धती आहे.

वंशपरंपरागत आजारही बरे झालेत -डॉ. पंचभाईडॉ. सोनल पंचभाई म्हणाले, अनेक व्याधी ज्या आधुनिक वैद्यकशास्त्राला आव्हानात्मक वाटतात त्या व्याधीवर अ‍ॅडव्हान्स होमिओपॅथीमुळे ६० ते ८० टक्के यश मिळाले आहे. यात वंशपरंपरागत आजारही बरे झाले आहेत. एवढेच नव्हे तर, या संपूर्ण केसेसचे ‘डाक्युमेंटेशन’सुद्धा उपलब्ध आहे. सध्या उपचारपद्धतीला ‘जेनेटिक बेस्ड’ बनवून ‘सायंटिफिक’ उपचार करण्यात येत आहे. ही उपचार प्रणाली केवळ आजारच दूर करीत नाही तर मूळासकट नष्ट करते.

टॅग्स :Healthआरोग्य