शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक आरोग्य दिन; स्पेशालिस्ट डॉक्टरांची गाव-खेड्यांकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 11:01 IST

सद्यस्थितीत बालरोग, स्त्रीरोग, बधिरीकरण, फिजिशियन, सर्जन, अस्थिव्यंगोपचार व रक्त संक्रमण विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) डॉक्टरांची ३७२ पदे मंजूर असताना २१७ पदे रिक्त आहेत.

ठळक मुद्देपूर्व विदर्भात ३७२ पैकी २१७ पदे रिक्तआरोग्य यंत्रणा विस्कळीत

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहचली पाहिजे, असे शासन म्हणत असले तरी, विविध विषयातील स्पेशालिस्ट (विशेषज्ञ) डॉक्टरांनी गाव-खेड्यात आपली सेवा देण्यास पाठ दाखवली आहे. सद्यस्थितीत बालरोग, स्त्रीरोग, बधिरीकरण, फिजिशियन, सर्जन, अस्थिव्यंगोपचार व रक्त संक्रमण विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) डॉक्टरांची ३७२ पदे मंजूर असताना २१७ पदे रिक्त आहेत. धक्कादायक म्हणजे, राज्याचे आरोग्य संचालक हे पद गेल्या चार महिन्यांपासून रिक्त आहे. परिणामी, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा लंगडी झाल्याचे वास्तव आहे.नागपूर आरोग्य सेवा मंडळांंतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा असे सहा जिल्हे येतात. यात पाच जिल्हा रुग्णालये, दोन स्त्री रुग्णालये, तीन शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालये, दहा ५० खाटांची उपजिल्हा रुग्णालये, ५१ ग्रामीण रुग्णालये, २५१ प्राथमिक आरोग्य केंद्र तर १ हजार ६४३ उपकेंद्र आहेत. या रुग्णालयांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवा दिली जाते. परंतु स्पेशालिस्ट डॉक्टरांचा वणवा असल्याने अनेक रुग्णांना पुढील उपचारासाठी शहरातील खासगी इस्पितळांसह नागपुरातील मेडिकल, मेयो, डागा रुग्णालयात धाव घ्यावी लागली आहे. यामुळे आरोग्य विभागाचाच आरोग्य सेवा देण्याचा उद्देश पूर्ण होत नसल्याचे स्पष्ट होते.चार महिन्यांपासून संचालकाचे पदही रिक्तराज्याचा आरोग्य संचालक पदावरून डॉ. संजीव कांबळे ३१ डिसेंबर २०१८ रोजी सेवानिवृत्त झाले. परंतु चार महिन्यांचा कालावधी होत असतानाही हे पद रिक्त आहे. सध्या राज्याचे आरोग्य आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव हे अतिरिक्त म्हणून संचालकाची जबाबदारी सांभाळत आहे.

‘एडीएचओ’ची पदे सहा वर्षांपासून रिक्तअतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचे (एडीएचओ) नागूपर जिल्ह्यात तीन पदे आहेत. परंतु गेल्या सहा वर्षांपासून ही पदेच भरण्यात आलेली नाहीत. परिणामी, याची जबाबदारी तहसील आरोग्य अधिकाऱ्याकडे दिली आहे.

वर्ग १ चा स्पेशालिस्ट डॉक्टर रुग्णसेवेपासून वंचितआरोग्य विभागात फार कमी स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत. यातही वर्ग १च्या स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे ‘अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ची कामे देण्यात आली आहेत. यामुळे ९० टक्के डॉक्टर ‘ओपीडी’त आपली सेवा देतच नाहीत.

एमबीबीएस डॉक्टरांना प्रशिक्षणही नाहीआरोग्य विभागात मोठ्या संख्येत एमबीबीएस डॉक्टर आहेत. पूर्वी या डॉक्टरांना त्यांच्या आवडीनुसार स्पेशालिटी विषयाचे प्रशिक्षण दिले जायचे. परंतु आता ते बंद झाले आहे. शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

बालरोग ५१, स्त्रीरोग ५८, बधिरीकरण तज्ज्ञाची ७२ पदे रिक्तमंडळांतर्गत येणाºया सहा जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये फिजिशियनची २७ पदे मंजुर असताना २० पदे रिक्त, बालरोगतज्ज्ञाची ९० पदे मंजूर असताना तब्बल ५१ पदे रिक्त, जनरल सर्जनची २६ पदे मंजूर असताना नऊ पदे रिक्त, स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञाची १०५ पदे मंजूर असताना ५८ पदे रिक्त, बधिरीकरण तज्ज्ञाची १०० पदे मंजूर असताना ७२ पदे रिक्त, अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञाची १९ पदे मंजूर असताना चार पदे रिक्त, रक्त संक्रमण तज्ज्ञाची पाच पदे मंजूर असताना तीन पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, सर्जन आहेत परंतु बधिरीकरण तज्ज्ञाची मोठी पदे रिक्त असल्याने शस्त्रक्रिया ठप्प पडल्या आहेत. गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यास ही रुग्णालये कमी पडत आहेत.

मृत्यूचे प्रमाण वाढतेयग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्ण आहेत, परंतु विशेषज्ञ नाही अशी गंभीर स्थिती आहे. नवनवीन आणि गुंतागुंतीचे आजार वाढले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील बालके, महिला तसेच वृद्धांवर तत्काळ उपचार मिळण्यास उशीर होत आहे. विभागाकडे रुग्णालये, औषधांचा साठा असूनही केवळ विशेषज्ञ नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

टॅग्स :Healthआरोग्य