शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक दृष्टिदान दिन; अंधत्व रोखण्यात विदर्भ आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 09:50 IST

आरोग्य विभागाने २०१८-१९ या वर्षात लोकसंख्येच्या आधारावर प्रत्येक जिल्ह्याला मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले होते. यात भंडारा जिल्ह्याने १९७ टक्के लक्ष्य गाठत राज्यात प्रथम स्थान पटकविले आहे.

ठळक मुद्देराज्यात पहिल्या पाचमध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर व अमरावती जिल्हा

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात मोतीबिंदू हे अंधत्वाचे मुख्य कारण आहे. दरवर्षी मोतिबिंदूमुळे अंधत्व येणाऱ्याची सरासरी काढल्यास ती साधारण ७२ टक्के आहे. मोतीबिंदूमुळे येणारे अंधत्व रोखण्यासाठी सरकारने ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ मोहीम हाती घेतली आहे. आरोग्य विभागाने २०१८-१९ या वर्षात लोकसंख्येच्या आधारावर प्रत्येक जिल्ह्याला मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले होते. यात भंडारा जिल्ह्याने १९७ टक्के लक्ष्य गाठत राज्यात प्रथम स्थान पटकविले आहे. तर पहिल्या पाचमध्ये गोंदिया, नागपूर, चंद्रपूर व अमरावतीचा जिल्ह्याचा समावेश आहे. सर्वात कमी लक्ष्य गाठणारा पालघर जिल्हा आहे.बुबुळासंबधी येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण हे जगभरात अंधत्वाचे चौथे मोठे कारण आहे. विशेषत: मोतीबिंदूमुळे येणारे अंधत्व टाळता येणारे आहे. एकट्या महाराष्टष्ट्रात सुमारे १७ लाख मोतीबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. यातील सुमारे पाच लाख रुग्णांवर तातडीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. याला ‘राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमां’तर्गत दरवर्षी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व एनजीओ हॉस्पिटल्सना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले जाते. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी शासनाकडून निधी व साहित्याचा पुरवठाही केला जातो. गेल्या वर्षात आरोग्य विभागाने राज्यातील ३५ जिल्ह्यांना त्यांच्या लोकसंख्येनुसार लक्ष्य दिले होते. यात भंडारा जिल्ह्याने १९७ टक्के लक्ष्य पूर्ण करून मोतीबिंदू शस्त्रक्रियेत प्रथम स्थान पटकाविले आहे. तर दुसºया स्थानावर १७७ टक्के लक्ष्य पूर्ण करणारा गोंदिया जिल्ह्या, तिसºया स्थानावर १४८ टक्के लक्ष्य पूर्ण करणारा नागपूर जिल्हा, चौथ्या स्थानावर १४६ टक्के लक्ष्य पूर्ण करणारा चंद्रपूर जिल्हा तर पाचव्या स्थानावर १३६ टक्के लक्ष्य पूर्ण करणारा अमरावती जिल्हा आहे. त्या खालोखाल यवतमाळ जिल्ह्याने १२४ टक्के, अकोला जिल्ह्याने १२२ टक्के, लातुर जिल्ह्याने १७७ टक्के, बिड जिल्ह्याने ११३ टक्के तर मुंबईने १०९ टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे.आरोग्य विभागाने राज्यातील ३५ जिल्हे मिळून १६५६९९ लक्ष्य दिले होते. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ४२४५५ तर जिल्हा रुग्णालय, उप-जिल्हा रुग्णालय व इतरही केंद्र मिळून ८९१०० असे एकूण १३१५५५ शस्त्रक्रिया केल्या. दिलेल्या लक्ष्याचा ७९ टक्के लक्ष्य पूर्ण करण्यास यश आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य