शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

जागतिक अंडी दिवस; शाकाहारी विद्यार्थ्यांची ‘कोंडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 11:40 IST

जागतिक अंडी दिवसाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थी व पालकांना अंड्यांचे महत्त्व सांगण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देपोषण आहारात कशी खाणार अंडी ? विद्यार्थ्यांसाठी खाण्याचा इतर विकल्पच नाही

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जागतिक अंडी दिवसाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थी व पालकांना अंड्यांचे महत्त्व सांगण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात अंड्यांचे वाटप करण्यात येईल. मात्र शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाने इतर कुठलाही विकल्प ठेवलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर दुसरा कुठलाच पर्याय नसेल. यामुळे विभाग व शाळा प्रशासनांना पालकांच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो. याबाबत शिक्षण विभागाने निर्देश जारी केले आहेत. याअंतर्गत शाळांना विशेष कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे. यात विद्यार्थ्यांना अंडी खाण्याचे फायदे सांगण्यात येतील. तसेच त्यांना रोज अंडी खाण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल. शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना अंडी देण्यात येतील. मात्र योजनेचा आराखडा तयार करत असताना अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजनात काय देणार याबाबत विचारच करण्यात आलेला नाही. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने विभागातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयांना दिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत व शालेय पोषण आहारात अंडी ठेवण्यास सांगण्यात आले आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण विभागाचे निर्देश मिळाल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारा संचालित शाळांमध्ये साडेचार लाख अंडी वाटण्याचे ध्येय निर्धारित करण्यात आले आहे. मात्र हे वाटप दररोज होईल की केवळ एकच दिवस हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. योजनेला प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देण्यात आली आहे. सर्व शाळांमध्ये आयोजन झाले पाहिजे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

काय आहे कारण ?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांअगोदर कृषी विभागाचे प्रधान सचिव (पणन) अनुप कुमार यांनी शालेय शिक्षण विभागाला पत्र लिहिले होते. यात त्यांनी १९९६ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय अंडी परिषदेचा हवाला देत राज्यातदेखील १२ आॅक्टोबर रोजी जागतिक अंडी दिवस साजरा करण्याची शिफारस केली होती.पत्रात तामिळनाडू व आंध्रप्रदेशसह अनेक राज्यात शालेय पोषण आहारात अंडी देण्याच्या बाबीचा उल्लेखदेखील होता. या पत्रावर शिक्षण विभागाने राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना दिनविशेष आयोजित करण्याचे निर्देश दिले.अंडी न खाणाऱ्यांचे काय ?अनेक विद्यार्थी अंडी न खाणाऱ्या कुटुंबातील आहेत. अशा विद्यार्थ्यांना अंड्यांच्या ऐवजी काय देण्यात येईल, हे शिक्षण विभागाने स्पष्ट केलेले नाही. अंडी खाण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर वैकल्पिक आहार देण्यात येणार नाही, असे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

अंड्यांची व्यवस्था होणार कशी ?‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारा संचालित शाळांमध्ये साडेचार लाख अंडी वाटण्याचे ध्येय निर्धारित करण्यात आले आहे. मात्र ही अंडी नेमकी कुठून येतील हे अद्याप ठरविण्यात आलेले नाही. यासंदर्भात जिल्हाच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला. मात्र खासगी कामात व्यस्त असल्याने त्यांनी कुठलीही माहिती देण्यास असमर्थता व्यक्त केली. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की अंड्यांसाठी ‘पोल्ट्री फार्म’सोबत संपर्क करण्यात आला आहे. याची व्यवस्था शालेय शिक्षण विभागातर्फे करण्यात आली आहे. विभागाने राज्यभरात ३० लाख अंडी वितरित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

टॅग्स :foodअन्न