शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक नृत्यदिन विशेष; क्वॉरंटाईन म्हणजे 'शॉर्ट टर्म समाधी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 07:00 IST

शास्त्रोक्त नर्तक मनाच्या तरंगाला साधनेशी जोडून नवा आयाम देतात. तोच नवा आयाम विकसित करण्याची संधी क्वॉरंटाईनने दिली आहे. जणू कलावंतांना हा क्वॉरंटाईनचा काळ म्हणजे शॉर्ट टर्म समाधी होय!

ठळक मुद्देनृत्याच्या भावभंगिमांचे होतेय चिंतन

प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केवळ हस्तमुद्रा, नेत्राभिनय आणि पदलालित्य म्हणजेच नृत्य हा केवळ भ्रम आहे. नृत्य तेच जे सृष्टीशी निगडित होऊन चराचरातील चैतन्याच्या झऱ्यात स्वत:ला झोकून दिले जाते. सर्वसामान्य व्यक्ती स्वत:चा ताण कमी करत शरिराला सैल सोडतात आणि मनाच्या तरंगात स्वत:ला वाहवत नेतात तर शास्त्रोक्त नर्तक मनाच्या त्याच तरंगाला साधनेशी जोडून नवा आयाम देतात. तोच नवा आयाम विकसित करण्याची संधी क्वॉरंटाईनने दिली आहे. जणू कलावंतांना हा क्वॉरंटाईनचा काळ म्हणजे शॉर्ट टर्म समाधी होय!कोरोना विषाणूच्या संक्रमणाचे थैमान सारे जग अनुभवतेय. सगळेच लॉकडाऊनमध्ये आहेत. अशात प्रशिक्षणही बंद पडले आहेत. प्रशिक्षण बंद पडले म्हणून शिक्षण बंद पडते, ती कला नव्हे. नित्य घडणाऱ्या घडामोडींचे आत्मचिंतन म्हणजे कला. उलट बंदीशाळेतूनच अभिव्यक्तीचा ऊहापोह होत असतो आणि क्रांती घडते. वनवासात असताना भीषण युद्धाची तयारी करायची म्हणून श्रीकृष्णाच्या आदेशाने अर्जुन दिव्यास्त्र कमाविण्यासाठी स्वर्गात गेला. तेव्हा इंद्राने त्यास गंधर्वाकडून कलेचे प्रशिक्षण घेण्याची आज्ञा केली. सर्व अस्त्रात कला हे सर्वश्रेष्ठ अस्त्र आणि सर्व ज्ञानात कला हे सर्वश्रेष्ठ ज्ञान असते आणि त्याशिवाय योद्धा अपूर्ण असतो.. असे इंद्र म्हणाला होता. यावरून कलेचे स्थान श्रेष्ठ आहे, हे सिद्ध होते. कलेत नृत्याचे स्थान श्रेष्ठ ठरते. अभिनय, संहिता, ताल, लय आणि भावना-संवदेनेचे एकत्रित निरुपण म्हणजे नृत्य. कोरोनाने सगळ्यांनाच एकटे पाडले आहे. एकलेपणाच्या तणावात माणूस जगतो आहे. भविष्यात इतिहास लिहिला जाईल तेव्हा या काळाचे प्री-कोरोना, मिड कोरोना आणि पोस्ट कोरोना असे भाग पाडले जातील. हाच भाग सध्या नृत्यकलेत उतरू पाहत आहे. अनेक नृत्यगुरू आपल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैलीत साधनेत मग्न होण्याचे आवाहन करत आहेत. त्याच काळात जागतिक नृत्य दिन साजरा होत आहे. एरवी जल्लोष आणि सोहळ्यादाखल साजरा होणारा हा दिन यंदा शांत असणार आहे. नृत्यगुरू शिष्यांना संकट म्हणजेच संधी असल्याचे सांगत आहेत आणि स्वत: कलाविष्कार करण्याचे आवाहन करत आहेत. ऑनलाईन सोहळे रंगत आहेत. हे जग ऑनलाईनचे म्हणून ही सुविधा. अन्यथा, चिंतन हेच सर्वश्रेष्ठ साधन म्हणून साधनेत मग्न होण्याचे आवाहन केले जात आहे.कोरोना आज आहे उद्या नाही - अवंती हर्षे-काटेसारेच जण कोरोनामुळे हैराण आहेत. जो तो कोरोना-कोरोना ओरडत आहे. मात्र, त्याहीपलिकडे अस्तित्त्व आहे आणि कला ते अस्तित्त्व जपून आहे. ब्रह्मदेवानेही सृष्टीची निर्मिती करताना जन्म-मृत्यूची संकल्पना मांडली होती. अस्तातून निर्मितीची प्रेरणा देण्यासाठीच कला सादर झाली. कोरोना आज आहे, उद्या नाही. या संकटातून निघताना कलाच महत्त्वाची ठरणार आहे. नृत्य दिनाच्या पार्श्व•ाूमीवर मी सुद्धा जन्म या संकल्पनेवर स्पिरिच्युअल नृत्याविष्कार सादर करत आहे. इतरांनीही रडत बसण्यापेक्षा मिळालेल्या निवांत वेळेचा सदुपयोग कलेची साधना करण्यात घालवावा, असे आवाहन प्रसिद्ध नृत्यांगणा व नृत्यगुरू अवंती हर्षे-काटे यांनी केले आहे.नृत्य अजूनही सुरूच!कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्र स्तब्ध झाले आहे. नृत्याचे प्रशिक्षणवर्गही थांबले आहेत. मात्र, नृत्याचे प्रशिक्षणवर्ग फोनवरून सुरू आहे. साध्या फोनवरून गुरु तोडे वगैरे समजावून सांगत असून, प्रशिक्षणार्थी आपल्या साधनेत रमले आहेत. नृत्याशी संबंधित निबंध स्पर्धा, ऑनलाईन नृत्य स्पर्धा राबविल्या जात आहेत. नृत्य दिनाला या नृत्यांजलीने युट्यूब, फेसबूक, इन्स्टाग्राम रंगणार आहेत, हे विशेष.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdanceनृत्य