शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘ड्रॅगन पॅलेस’ होणार वर्ल्ड क्लास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 21:41 IST

ड्रॅगन पॅलेसमध्ये बुद्धिस्ट राष्ट्रांतून येणाऱ्या पर्यटकांना बुद्धांच्या जीवनाची माहिती कळण्यासाठी सिंगापूरच्या लाईट व साऊंड शोप्रमाणे एक ‘वर्ल्ड प्राईड सेंटर आॅफ बुद्धिझम’ हा प्रकल्प स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्रीय पर्यटन मंत्र्यालयास एक प्रकल्प प्रस्ताव पाठविला आहे. या प्रकल्पामुळे ड्रॅगन पॅलेस हे केवळ भारतातच नव्हे तर जगात विख्यात होईल. यासाठी या अहवालास मंजुरी देऊन या प्रकल्पाच्या निर्मितीस केंद्रीय पर्यटन मंत्र्यानी सहकार्य करावे, असे केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सुचविले. यावर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के.जे. अल्फॉन्स यांनी ‘ड्रॅगन पॅलेसच्या ‘वर्ल्ड प्राईड सेंटर आॅफ बुद्धिझम’ या प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटीच्या निधी प्रकल्पाचा डी. पी. आर. (सविस्तर प्रकल्प अहवाल) त्वरित मंजूर करू, असे आश्वासन येथे दिले.

ठळक मुद्देगडकरींची सूचना, पर्यटनमंत्र्यांचे आश्वासन : आंतरराष्ट्रीय बौद्ध शांतता परिषदेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ड्रॅगन पॅलेसमध्ये बुद्धिस्ट राष्ट्रांतून येणाऱ्या पर्यटकांना बुद्धांच्या जीवनाची माहिती कळण्यासाठी सिंगापूरच्या लाईट व साऊंड शोप्रमाणे एक ‘वर्ल्ड प्राईड सेंटर आॅफ बुद्धिझम’ हा प्रकल्प स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्रीय पर्यटन मंत्र्यालयास एक प्रकल्प प्रस्ताव पाठविला आहे. या प्रकल्पामुळे ड्रॅगन पॅलेस हे केवळ भारतातच नव्हे तर जगात विख्यात होईल. यासाठी या अहवालास मंजुरी देऊन या प्रकल्पाच्या निर्मितीस केंद्रीय पर्यटन मंत्र्यानी सहकार्य करावे, असे केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सुचविले. यावर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के.जे. अल्फॉन्स यांनी ‘ड्रॅगन पॅलेसच्या ‘वर्ल्ड प्राईड सेंटर आॅफ बुद्धिझम’ या प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटीच्या निधी प्रकल्पाचा डी. पी. आर. (सविस्तर प्रकल्प अहवाल) त्वरित मंजूर करू, असे आश्वासन येथे दिले.कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरात ओगावा सोसायटीच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट शांतता परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या व ड्रॅगन पॅलेसच्या संस्थापक अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, आंतरराष्ट्रीय महाबोधी मेडिटेशन सेंटर, लेह-लद्दाखचे संचालक भदंत संघसेना याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बुद्धिस्ट माहिती पुस्तिकेचे विमोचनही करण्यात आले.ड्रॅगन पॅलेसपर्यंत येण्यासाठी आता पुढील काळात मेट्रोचे स्टेशन निर्माण होणार असून त्यांची संरचनाही ड्रॅगन पॅलेससारखीच राहील, अशी माहितीही गडकरी यांनी यावेळी दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी तर आभार प्रदर्शन नगरसेविका वंदना भगत यांनी केले.नागपूरची मेट्रो ‘ड्रॅगन पॅलेस’पर्यंत येणार - पालकमंत्री बावनकुळेनागपूरचे पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर-कन्हान-कामठी हा ३०० कोटी रुपयांचा रस्ता सहा महिन्यात पूर्ण होणार असल्याचे सांगितले. नागपूर मेट्रो ड्रॅगन पॅलेसपर्यंत येणार असून मेट्रोचे सहा स्टेशन्स कामठीत राहतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीDhammbhumiधम्मभूमी