शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

नूतनीकरण न झाल्याने कामगाराचे अनुदान अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 19:20 IST

राज्यात १८ लाखांपेक्षा अधिक मजुरांची राज्य शासनाकडे नोंदणी आहे. यात नागपुरातील ४४ हजार ५१० नोंदणीकृत मजुरांचा समावेश आहे. या मजुरांना दरवर्षी त्यांचे नूतनीकरण करणे आवश्यक असते. मात्र सर्व नोंदणीकृत मजुरांच्या नोंदणीची मुदत मार्च-एप्रिल २०२० मध्ये संपलेली असतानाही कोरोना संसर्गामुळे नूतनीकरण करता आले नाही. यामुळे कामगारांचे प्रत्येकी दोन हजार रुपये सानुग्रह अनुदान नाकारण्यात आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

ठळक मुद्देकोविड-१९ मुळे नूतनीकरण न करता अनुदान देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात १८ लाखांपेक्षा अधिक मजुरांची राज्य शासनाकडे नोंदणी आहे. यात नागपुरातील ४४ हजार ५१० नोंदणीकृत मजुरांचा समावेश आहे. या मजुरांना दरवर्षी त्यांचे नूतनीकरण करणे आवश्यक असते. मात्र सर्व नोंदणीकृत मजुरांच्या नोंदणीची मुदत मार्च-एप्रिल २०२० मध्ये संपलेली असतानाही कोरोना संसर्गामुळे नूतनीकरण करता आले नाही. यामुळे कामगारांचे प्रत्येकी दोन हजार रुपये सानुग्रह अनुदान नाकारण्यात आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रातील इमारत बांधकाम मजुरांच्या खात्यावर सरसकट दोन हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे आश्वासन राज्यातील आघाडी सरकारने दिले होते. परंतु आता त्याचा विसर राज्याच्या कामगार मंत्र्यांना पडला असून महाराष्ट्रातील मजुरांची फसवणूक केली असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष तथा मनपाचे विधी समिती सभापती अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांनी पत्रकाद्वारे केला आहे.लॉकडाऊनमध्ये इमारत बांधकाम मजुरांची वाताहत होऊ नये या उद्देशाने राज्याचे कामगार मंत्री तथा महाराष्ट्र इमारत बांधकाम मजूर कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी मजुरांच्या बँक खात्यात सरसकट दोन हजार रुपये सानुग्रह देण्याची घोषणा केली होती. लॉकडाऊन कालावधीत मजुरांचे मोठे हाल होत आहेत. परिणामी त्यांना पायपीट करून आपल्या मूळ गावी परत जावे लागत आहेत. युती सरकारच्या काळात सर्व मजुरांना सानुग्रह अनुदान दिले होते. याशिवाय १४ प्रकारच्या अवजारांची किट वितरण आणि सर्व मजुरांची संपूर्ण आरोग्य तपासणीही करण्यात आली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारद्वारे इमारत बांधकाम मजुरांसाठी ३७ कोटीची अधिकृत घोषणा करण्यात आली पण त्यावर काही अंमलबजावणी करण्यात नसल्याचा आरोप मेश्राम यांनी केला आहे.कोरोना संसर्गामुळे नूतनीकरण करता आले नाहीकामगारांना दरवर्षी त्यांचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. मात्र सध्या कोविड-१९च्या प्रादुभार्वामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे या गरीब कामगारांना नूतनीकरण करणे शक्य नाही. राज्यातील सुमारे १८ लाखाहून अधिक कामगारांना याचा फटका बसणार आहे. अशा स्थितीत या सर्व कामगारांना या वर्षी सरसकट मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणीही मेश्राम यांनी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे

टॅग्स :GovernmentसरकारfundsनिधीLabourकामगारcorona virusकोरोना वायरस बातम्या