शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

टेंडर न काढताच दिले जात आहे ७८.६४ कोटींचे काम; नागपूर मनपाचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 13:01 IST

नागपूर मनपातील सत्ताधारी भाजप सरकारने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला अडीच दशकासाठी खासगी हाातात सोपवले. आता परिस्थती अशी आहे की, करार होऊन ९ वर्षे उलटल्यानंतरही शहरातील एक तृतीयांश नागरिकांनाही पुरेसे पाणी उपलब्ध झालेले नाही.

ठळक मुद्देपाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्याच्या नावावर लुटमार

लोकमत न्यूज नेटवर्कराजीव सिंहनागपूर : प्रत्येक घराला २४ तास पाणीपुरवठा होईल, असे स्वप्न दाखवून मनपातील सत्ताधारी भाजप सरकारने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला अडीच दशकासाठी खासगी हाातात सोपवले. आता परिस्थती अशी आहे की, करार होऊन ९ वर्षे उलटल्यानंतरही शहरातील एक तृतीयांश नागरिकांनाही पुरेसे पाणी उपलब्ध झालेले नाही. मंद कार्यप्रणालीनंतरही पाणीपुरवठा कंपनी ऑरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) ला नागपूर महापालिका तब्बल ७८ कोटी ६४ लाख ९५ हजार रुपयाचे अतिरिक्त काम देत आहे.

यासंदर्भात मनपा व ओसीडब्ल्यू दरम्यान मध्यस्थाची भूमिका निभावण्यासाठी बनवण्यात आलेली कंपनी नागपूर एन्वायरमेंटल सर्व्हिसेस लिमिटेड (एनईएसएल) तर्फे बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या निदेर्शानुसार २१ ऑक्टोबर २०२० रोजी पत्र जारी करीत अतिरिक्त काम करण्यासाठी २४ ऑक्टोबरपर्यंत उत्तर मागविण्यात आले आहे. संबंधित काम निविदा न काढता कराराच्या आधारावर थेट अतिरिक्त काम ओसीडब्ल्यूला देण्याची योजना असल्याचे सांगितले जाते.एनईएसएलमध्ये महापौर, आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्यासह अनेक महत्त्वाचे लोक आहेत. यानंतरही निविदा न काढता काम देण्याच्या प्रस्तावाला सहमती दर्शविणे अनेक प्रश्न निर्माण करते. नागपुरात २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेसाठी ओसीडब्ल्यूसोबत मनपाने ३ जून २०११ रोजी करार केला. २५ वर्षांसाठी हा करार झालेला आहे. १ मार्च २०१२ रोजी आॅपरेटरने प्रकल्प आपल्या हाती घेतला. पाईपलाईन बदलणे, वॉल्व लावणे, पाण्याच्या टाकीची दुरुस्ती आदी कामांसाठी ५ वर्षाचा करार झाला. परंतु काम निश्चित कालावधीत पूर्ण न झाल्यामुळे कंपनीला मुदतवाढ मिळाली. माजी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना इशारा देत २०१९ पर्यंत काम कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे आदेश दिले. नंतर त्यांची बदली झाली. परंतु काम अजूनही पूर्ण झालेले नाही. मार्च २०२२ पर्यंतची मुदतवाढ पुन्हा मिळालेली आहे. मुदतवाढीसोबतच कोट्यवधी रुपयांचे अतिरिक्त काम देऊन नागरिकांचे पैसे लुटवण्याचे काम सत्तारुढ भाजप करीत आहे.अतिरिक्त काम देण्याचा कुठलाही निर्णय नाहीमनपाच्या अधीक्षक अभियंता (पाणीपुरवठा) श्वेता बॅनजीर्ने सांगितले की, ओसीडब्ल्यूसोबत २५ वर्षार्साठी करार झालेला आहे. अतिरिक्त काम देण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेंतर्गत त्यांनी पाईपलाईन बदलवण्याचे काम पूर्ण केलेले आहे.

एक तृतीयांश ग्राहकांनाही पुरेसे पाणी नाही- २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना म्हणजे शहरवासीयांना २४ तास पाणी उपलब्ध करण्याची योजना होय. पाच वर्षात यावर अंमलबजावणी होणार होती. परंतु आतापर्यंत एक तृतीयाांश नागरिकांनाही पुरेसे पाणी पोहचवू शकले नाही.

टॅग्स :Waterपाणी