शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर कामाचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 21:42 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागातील प्राध्यापकांची पदे तर मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेतच. परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदेदेखील रिक्त आहेत. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवरदेखील कामाचा ताण जास्त वाढलेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागातील प्राध्यापकांची पदे तर मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेतच. परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदेदेखील रिक्त आहेत. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवरदेखील कामाचा ताण जास्त वाढलेला आहे. गट ‘अ’ व ‘ब’ प्रवर्गातील अधिकाऱ्यांची तर ७५ टक्के पदे रिक्त आहेत. अशा स्थितीत ‘नॅक’च्या मूल्यांकनात ‘ए प्लस’ श्रेणी व ‘एनआयआरएफ’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क) पहिल्या शंभरात स्थान कसे मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नागपूर विद्यापीठात कर्मचारी व अधिकारी मिळून एकूण ३८ टक्के पदे रिक्त आहेत. अनेक विभागात तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा घेतली जात आहे. ‘अ’ प्रवर्गातील ६० पैकी ४१ पदे रिक्त आहेत. तर ‘ब’ प्रवर्गातील ५२ पैकी ४३ पदे रिक्त आहेत. दोन्ही प्रवर्गातील रिक्त पदांची टक्केवारी अनुक्रमे ६८.३३ व ८२.६९ टक्के इतकी आहे. ‘क’ प्रवर्गात ४७६ मंजूर पदे असून त्यातील १५८ पदे रिक्त आहेत. तर ‘ड’ प्रवर्गात २७६ पदांपैकी ८९ पदे रिक्त आहेत. नागपूर विद्यापीठात गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापकांची पदभरती झालेली नाही. दुसरीकडे दरवर्षी विविध विभागातील कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. याचा फटका विभागांमधील प्रशासकीय प्रणालीला बसतो आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तर कामाचा विशेष ताण आहे. परीक्षा विभागात तर अनेकदा कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत आहे.विविध विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. एकूण मंजूर पदांपैकी सुमारे ३८ टक्के पदे रिक्त आहेत. राज्य शासनाकडून पदभरतीला अद्यापही हिरवा ‘सिग्नल’ मिळालेला नाही.शिक्षक भरतीदेखील रखडलेलीचविद्यापीठातील पदव्युत्तर विभागांत ३३४ पदांना मंजुरी आहे. मात्र, सध्या केवळ १४० प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यामुळे रिक्त पदांचा आकडा १९४ एवढा आहे. येत्­या काही महिन्यात काही प्राध्यापक रिक्त होणार आहेत. त्यामुळे यात वाढ होणार आहे. शिक्षक भरतीदेखील अनेक वर्षांपासून रखडलेलीच आहे.रँकिंग कसे वाढणारविद्यापीठाच्या नॅक मूल्यांकनाची गाडी अद्यापही अडलेलीच आहे. यात रिक्त जागांची संख्या डोकेदुखी ठरू शकते. दुसरीकडे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ‘रँकिंग फ्रेमवर्क’ जाहीर करणाऱ्या ‘रँकिंग’मध्ये पहिल्या १०० मध्ये येण्यासाठी विद्यापीठाचा दर्जा वाढणे आवश्यक आहे. यासाठी रिक्त जागा भरल्या गेल्या पाहिजेत.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ