लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराचे तापमान ४६ अंशावर गेले असताना, अंगाची लाहीलाही होत असताना डोक्यापासून केवळ चार फुटावर असलेल्या टिनाच्या शेड खाली प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणचा कार्यभार सुरू आहे. एका हाताने घाम पुसत दुसऱ्या हाताने कागदपत्राची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांपासून ते कर्मचारी त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, या कार्यालयाचा इमारतीचे बांधकाम सुरू होऊन चार वर्षे झालीत. १४ कोटी रुपयांवर निधी खर्चही झाला. परंतु अद्यापही बांधकाम अर्धवटच आहे. परिणामी, याचा फटका कार्यालयासोबत येथे येणाऱ्या सामान्यांना बसत आहे.कामठी रोडवरील अन्न पुरवठा विभागाच्या गोदामात २००८ पासून नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालय अडकून पडले आहे. केवळ आठ हजार चौरस फुटाच्या जागेवर जिल्हासह नागपूर विभागाचा डोलारा हे कार्यालय सांभाळत आहे. परंतु येथे सोयीच्या नावाने चार भिंती आणि डोक्यावर टिनाचे छप्पर एवढेच आहे. येथील कार्यालयीन कर्मचाऱ्यांसोबतच विविध कामानिमित्त येणाऱ्याना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. कार्यालयात पाण्याची विशेष सोय नाही. प्रसाधन गृहाचा अभाव आहे. येथील कर्मचारी परिसरातील ओळखीच्या घरातील प्रसाधन गृहाचा वापर करतात. महिला कर्मचाऱ्यांची तारांबळ उडते तर येथे येणारे वाहनधारक मैदानाचा आश्रय घेतात. कार्यालयात पार्किंगची सोय नाही. अवैध पार्किंगचा व्यवसाय जोरात सुरू आहे. स्वत:ची जागा नसल्याने कार्यालयाच्या चार भिंती सोडल्यास संपूर्ण परिसरात हातठेल्यांपासून ते ‘ऑनलाईन’ केंद्राचे अतिक्रमण आहे. अतिक्रमण एवढे की जिथे अर्जदारांची रांग लागते तिथेच दलालांचे टेबलही लागतात. कार्यालयाच्या आत तर भयाण चित्र आहे. कोंबड्याच्या खुराड्यासारख्या जागेत डोक्यापासून चार ते पाच फुटावर असलेल्या टिनाचा शेडखाली कार्यालयाचे कामकाज चालते.डोक्याला रुमाल बांधून करावे लागते काम
तापत्या टीनाच्या शेड खाली ग्रामीण आरटीओचे कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:04 IST
शहराचे तापमान ४६ अंशावर गेले असताना, अंगाची लाहीलाही होत असताना डोक्यापासून केवळ चार फुटावर असलेल्या टिनाच्या शेड खाली प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणचा कार्यभार सुरू आहे. एका हाताने घाम पुसत दुसऱ्या हाताने कागदपत्राची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांपासून ते कर्मचारी त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, या कार्यालयाचा इमारतीचे बांधकाम सुरू होऊन चार वर्षे झालीत. १४ कोटी रुपयांवर निधी खर्चही झाला. परंतु अद्यापही बांधकाम अर्धवटच आहे. परिणामी, याचा फटका कार्यालयासोबत येथे येणाऱ्यां सामान्यांना बसत आहे.
तापत्या टीनाच्या शेड खाली ग्रामीण आरटीओचे कामकाज
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांसोबतच सामान्यांना फटका