शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महाराजबाग रस्त्याचे काम अपूर्णच

By admin | Updated: March 31, 2017 02:52 IST

महाराजबाग ते विद्यापीठ ग्रंथालय या रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. परंतु अजूनही डांबरीकरण झालेले नाही.

काम बंदच : नागपूरकर त्रस्त : डांबरीकरण कधी होणार? नागपूर : महाराजबाग ते विद्यापीठ ग्रंथालय या रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. परंतु अजूनही डांबरीकरण झालेले नाही. ६६० मीटरच्या या रस्त्याचे डांबरीकरण कधीपर्यंत पूर्ण होणार, याबाबत महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारीसुद्धा ठोसपणे सांगू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या रस्त्याचे डांबरीकरण रखडले आहे. त्याचा त्रास मात्र वाहन चालकांना सोसावा लागत आहे. या रस्त्याची रुंदी फुटपाथ व डिव्हायडरसह २४ मीटर इतकी आहे. या २४ मीटरमध्ये रस्त्याच्या डांबरीकरणासोबतच डिव्हायडर व फुटपाथचे कामही करायचे आहे. महाराजबाग प्रवेशद्वार ते विद्यापीठ ग्रंथालयासमोर सेनापती बापट चौकापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे. मनपा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप जामगडे यांनी सांगितले की, महाराजबागच्या रस्त्यावर डांबरीकरणासह अनेक काम एकाच वेळी पूर्ण करावयाचे आहे. यामुळे कामाला वेळ लागत आहे. डिव्हायडरचे काम सुरू होते. परंतु स्ट्रीट लाईटचे काम सुरू असल्याने वीज विभागाच्या सांगण्यावर काम थांबवण्यात आले आहे. विजेचे काम सुरू असल्याने रस्त्याचे काम बंद करावे लागले. नाही तर पुन्हा खोदावे लागले असते. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार, असा प्रश्न लोकमतने विचारला असता त्यांनी मौन पाळले, नंतर वीज विभागाला याबाबत विचारा, असे सांगितले.(प्रतिनिधी) डिव्हायडर व फुटपाथचे कामही अपूर्णचमहाराजबागच्या मार्गावर फुटपाथ बनविण्याचे काम सुरू आहे. परंतु डांबरीकरणाप्रमाणेच याचे कामही संथगतीने सुरू आहे. महाराजबागच्या जवळपासच फुटपाथ बनलेले दिसून येतात. डिव्हायडरचे कामही सुरू होते. परंतु ते आता बंद पडले आहे. डिव्हायडरसुद्धा पूर्ण झालेले नाही गटारी उघड्याच रस्त्याच्या बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी गडरलाईन टाकण्यात आली आहे. या गडरलाईनवर झाकण बसविण्याचे कामही बंद पडले आहे. गटारी उघड्याच आहेत.