शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

नागपूर विद्यापीठाच्या इमारतीचे काम परत लांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 21:24 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाला साडेतीन वर्षे उलटूनदेखील बांधकाम अद्यापही पूर्ण झालेले नाही. या इमारतीच्या बांधकामासाठी बजाज उद्योग समूहातर्फेदेखील १५ कोटींचा निधी देण्यात आला आहे व कुठल्याही निधीची कमतरता भासलेली नाही. मात्र कंत्राटदाराला दोनहून अधिक वेळा मुदतवाढ देऊनदेखील काम लांबलेलेच आहे. विद्यापीठाने दिलेले १३ एप्रिलपर्यंतचे ‘टार्गेट’ गाठण्यात अपयश आले असून कंत्राटदाराने परत एकदा मुदतवाढ मागितली आहे. अशा स्थितीत अगोदर म्हटल्याप्रमाणे कंत्राटदारावर विद्यापीठ कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देआणखी एकदा ‘तारीख पे तारीख’ : कंत्राटदारावर आता तरी कारवाई होणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाला साडेतीन वर्षे उलटूनदेखील बांधकाम अद्यापही पूर्ण झालेले नाही. या इमारतीच्या बांधकामासाठी बजाज उद्योग समूहातर्फेदेखील १५ कोटींचा निधी देण्यात आला आहे व कुठल्याही निधीची कमतरता भासलेली नाही. मात्र कंत्राटदाराला दोनहून अधिक वेळा मुदतवाढ देऊनदेखील काम लांबलेलेच आहे. विद्यापीठाने दिलेले १३ एप्रिलपर्यंतचे ‘टार्गेट’ गाठण्यात अपयश आले असून कंत्राटदाराने परत एकदा मुदतवाढ मागितली आहे. अशा स्थितीत अगोदर म्हटल्याप्रमाणे कंत्राटदारावर विद्यापीठ कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.‘कॅम्पस’जवळील ४४ एकर मोकळ्या जागेवर नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी बजाज समूहातर्फे ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) अंतर्गत १५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २६ सप्टेंबर २०१५ रोजी याचे भूमिपूजन पार पडले. यावेळी राहुल बजाज यांनी हे काम दोन वर्षांत पूर्ण व्हायला हवे असे प्रतिपादन केले होते. मात्र साडेतीन वर्ष उलटून गेल्यावरदेखील काम पूर्ण झाले नाही. नागपूर विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम कधी पूर्ण होणार असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. मागील काही काळापासून बांधकामाने वेग घेतला असल्याचे दावे करण्यात येत असले तरी प्रशासनाने कंत्राटदाराला १३ डिसेंबर अगोदर हे काम पूर्ण करण्याचे ‘टार्गेट’ दिले होते. जर वेळेत काम पूर्ण झाले नाही तर कंत्राटदाराकडून दिवसाला पाच हजार रुपये दंड ठोठाविण्यात येईल, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले होते. उन्हाळ्यात झालेली पाण्याची कमतरता, उपलब्ध न झालेली रेती आणि नोटाबंदी यामुळे बांधकामास विलंब झाल्याने कामाची ‘डेडलाईन’ वाढविण्यात यावी, अशी विनंती कंत्राटदारातर्फे करण्यात आली होती. हा मुद्दा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. आश्चर्याची बाब म्हणजे व्यवस्थापन परिषदेनेदेखील मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती व १३ एप्रिलपर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र या मुदतीतदेखील काम पूर्ण होऊ शकले नाही. सद्यस्थितीत इमारत उभी झाली असली तरी तेथील बरेच काम शिल्लक आहे. सोबतच ‘इलेक्ट्रीकल’, ‘प्लंबिंग’ इत्यादी कामेदेखील अपूर्ण आहेत. अशा स्थितीत जूनपर्यंत तर काम पूर्ण होणे अशक्य असल्याचे मत एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले.कुलगुरू शब्द पाळणार का ?मागील वेळी कंत्राटदाराच्या विनंतीवरुन काम पूर्ण करण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. मात्र एप्रिल २०१९ पर्यंत काम पूर्ण झाले नाही तर कंत्राटदाराला दररोज पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असा दावा कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी केला होता. आता १३ मेदेखील उलटून गेल्यावर काम पूर्ण झालेले नाही. अशा स्थितीत कुलगुरू आपला शब्द पाळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.कंत्राटदाराने दिले रेतीघाटाचे कारणरेती घाट बंद असल्याने चार महिन्यात इमारत बांधकाम पूर्ण होऊ शकले नसल्याचे कारण देत कंत्राटदाराने पुन्हा एकदा बांधकामाच्या मुदतवाढीसाठी विद्यापीठाकडे अर्ज केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून रेतीघाटाचे लिलाव निवडणूक व अन्य कारणांनी लांबले. त्याचा बांधकामावर फटका बसल्याचे अर्जात नमूद आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ