शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अफलातून तस्करी : पायाला बांधल्या दारूच्या बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:26 IST

आजपर्यंत आरोपींनी दारूच्या तस्करीसाठी वेगवेगळी शक्कल लढविली आहे. सोमवारीही एका आरोपीने आपल्या पायाला दारूच्या बाटल्या दोरीच्या साह्याने गुंडाळल्या. जीन्सच्या आतून घातलेल्या बरमुड्यातही बाटल्या भरल्या. परंतु गाडीची वाट पाहत असताना रेल्वे सुरक्षा दलाची करडी नजर त्याच्यावर गेली अन् त्याला मुद्देमालासह अटक करण्यात आली.

ठळक मुद्देनागपूर रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आजपर्यंत आरोपींनी दारूच्या तस्करीसाठी वेगवेगळी शक्कल लढविली आहे. सोमवारीही एका आरोपीने आपल्या पायाला दारूच्या बाटल्या दोरीच्या साह्याने गुंडाळल्या. जीन्सच्या आतून घातलेल्या बरमुड्यातही बाटल्या भरल्या. परंतु गाडीची वाट पाहत असताना रेल्वे सुरक्षा दलाची करडी नजर त्याच्यावर गेली अन् त्याला मुद्देमालासह अटक करण्यात आली.भय्यालाल पांडुरंग तेलंग (४४) रा. महाराणाप्रताप वॉर्ड, बल्लारशाह आरोपीचे नाव आहे. भय्यालालला दारूची तस्करी करण्याच्या गुन्ह्यात यापूर्वीही अटक झालेली आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास तो प्लॅटफार्म क्रमांक ३ वर गाडीची वाट पाहत होता. यावेळी कर्तव्यावर असलेले आरपीएफचे जवान दिनेशसिंग, विकास शर्मा, विवेक कनोजिया, अर्जुन पाटोळे आणि रामसिंग ठाकूर यांना भय्यालालवर शंका आली. त्याने सैल असलेली जीन्स पँट आणि जीन्सचे जॅकेट घातले होते. एवढ्या गरमीच्या वातावरणात जीन्सचे जॅकेट घातल्यामुळे आरपीएफ जवानांना शंका आली. त्यांनी त्याची चौकशी केली असता जीन्समध्ये दारू असल्याची कबुली त्याने दिली. जीन्समधील बरमुड्यातील खिशात आणि पायाला दारूच्या बाटल्या दोरीने बांधल्याचे त्याने सांगितले. लगेच त्यास अटक करून रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात आणण्यात आले. एकूण ६० दारूच्या बाटल्या तो घेऊन जात होता. रेल्वे सुरक्षा दलाने कागदोपत्री कारवाई पूर्ण करून आरोपीला मुद्देमालासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द केले. ही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक वीरेंद्र वानखेडे आणि जवानांनी पार पाडली.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरliquor banदारूबंदी