शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नागपूरच्या ‘हॉटेल द लिजेंड इन’ मध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या  महिलेस कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 22:01 IST

सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘हॉटेल द लिजेंड इन’ मध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या  एका महिला आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. काझी यांच्या न्यायालयाने १ वर्ष सश्रम कारावास आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देकपड्याच्या व्यवसायाचे आमिष दाखवून तरुणींना आणले होते यवतमाळ येथूनजामीन मिळताच आरोपी महिलेचा पती झाला होता फरार

आॅनलाईन लोकमतनागपूर : सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘हॉटेल द लिजेंड इन’ मध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या  एका महिला आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. काझी यांच्या न्यायालयाने १ वर्ष सश्रम कारावास आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.रितू अमित माडेवार (२९), असे आरोपी महिलेचे नाव असून ती यवतमाळच्या रागिणी अपार्टमेंट येथील रहिवासी आहे. या महिलेचा पती अमित अनिल माडेवार (४२) हा जामीन होताच फरार झाल्याने त्याच्याविरुद्ध वेगळा खटला चालणार आहे.खटल्याची पार्श्वभूमी अशी की, आरोपी माडेवार दाम्पत्याने यवतमाळ येथील दोन तरुणींना कपडे विकण्याच्या व्यवसायाचे आमिष दाखवून नागपुरात आणले होते. या तरुणींना त्यांनी सोनेगाव भागातील हॉटेल द लिजेंड इनच्या खोली क्रमांक ३०९ आणि ३१४ मध्ये ठेवले होते. प्रत्यक्षात या तरुणींना त्यांनी देहव्यापारात गुंतवले होते. हे दाम्पत्य या तरुणींना गिऱ्हाईकाना उपलब्ध करून देत होते आणि मोठ्या प्रमाणावर आपला आर्थिक फायदा करून घेत होते.१४ आॅक्टोबर २०१६ रोजी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बनावट गिऱ्हाईक  पाठविला होता. त्याच वेळी या विभागाने धाडीची कारवाई करून या दाम्पत्याला रंगेहात अटक केली होती आणि दोन्ही तरुणींची सुटका केली होती. या प्रकरणी सोनेगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंविच्या ३७०, ३४ आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३, ४, ५, ६, ७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक पी. सी. सोनवणे यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी दाम्पत्याविरुद्ध आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. आरोपी अमित माडेवार हा जामीन मिळताच फरार झाला होता. न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन आरोपी महिलेला ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील श्रीकांत गौळकर यांनी तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. राकेश कोचर यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल फय्याज खान, रविकिरण भास्करवार, कॉन्स्टेबल मंगेश डवरे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.