शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

टेरेसवर छुपे कॅमेरे लावून 'तो' बघायचा महिलांचा व्यायाम; ११ महिन्यांपासून सुरू होता चावटपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 11:07 IST

Nagpur News टेरेसवर छुपे कॅमेरे लावून सकाळ-संध्याकाळ महिलांचा व्यायाम बघणाऱ्या एका भामट्याचा चावटपणा तब्बल ११ महिन्यांनंतर उघड झाला.

 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : टेरेसवर छुपे कॅमेरे लावून सकाळ-संध्याकाळ महिलांचा व्यायाम बघणाऱ्या एका भामट्याचा चावटपणा तब्बल ११ महिन्यांनंतर उघड झाला. त्यानंतर संतप्त महिलांनी सुधीर हडगे (वय ५०) या आरोपीविरुद्ध हुडकेश्वर ठाण्यात धाव घेतली. (Women's exercise of watching  with hidden cameras on the terrace)

आरोपी सुधीर आणि तक्रार करणारी महिला (वय ५२) एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात. महिला सकाळ-सायंकाळ अन्य काही महिलांसह आपल्या अपार्टमेंटच्या टेरेसवर व्यायाम करतात. आरोपी सुधीरने नकळतपणे टेरेसवर ठिकठिकाणी छुपे कॅमेरे लावले. त्यातून तो महिलांचा व्यायाम बघत होता. ३० ऑक्टोबर २०२० पासून त्याचा हा चावटपणा सुरू होता. १२ ऑगस्टला पहाटे ५.३० वाजता तक्रारदार महिला नेहमीप्रमाणे व्यायाम करीत असताना तिला शंका आली. त्यानंतर तिने नातेवाइकांकडून तपासणी करून घेतली असता आरोपी सुधीरची मानसिक विकृती पुढे आली. यासंबंधाने २३ ऑगस्टला मोठा वाद झाल्यानंतर महिलेने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार सार्थक नेहते यांनी तक्रारीची शहानिशा करून घेत मंगळवारी या प्रकरणात विनयभंग तसेच धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

महिलेचा पाठलाग करून टॉन्टिंग

आरोपी सुधीर हा कॅमेरात महिलांना बघत होताच. तक्रारदार महिला घराबाहेर पडली की तिचा पाठलाग करायचा. तिला अश्लील हातवारे करून टॉन्टिंगही करायचा, असेही महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणाची हुडकेश्वर परिसरात दोन दिवसांपासून उलटसुलट चर्चा असून, सुधीर हडगेनेही पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी दांपत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक एस. कोडापे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

---

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी