शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Women's Day 2019; ध्येय, परिश्रमाने घडवले ‘आयएएस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 10:23 IST

चिकाटी, परिश्रम आणि स्वबळावर आयएएस झाले. लिंगभेद हा लहानपणापासूनच अनुभवला. समाजात स्त्री-पुरुष समानता असावी, असे मत आहे राज्याच्या वस्त्रोद्योग विभागात संचालक पदावर कार्यरत डॉ. माधवी खोडे यांचे.

ठळक मुद्दे वस्त्रोद्योग संचालक डॉ. माधवी खोडे-चवरेस्त्री-पु रुष समानता असावी

मोरेश्वर मानापुरेनागपूर: घरात तीन बहिणी. मी तिसऱ्या क्रमांकाची. त्यामुळे मुलीने शिकलेच पाहिजे, असे घरी कधीही वाटले नाही. पण अभ्यासाशिवाय भवितव्य नाही, या ध्येयाने शिक्षणाला वाहून घेतले. चिकाटी, परिश्रम आणि स्वबळावर आयएएस झाले. लिंगभेद हा लहानपणापासूनच अनुभवला. समाजात स्त्री-पुरुष समानता असावी, असे मत आहे राज्याच्या वस्त्रोद्योग विभागात संचालक पदावर कार्यरत डॉ. माधवी खोडे यांचे.खोडे म्हणाल्या, दहावीत अमरावती विभागात पाचवे मेरिट आणि बारावीत नागपूर विभाग व विदर्भात पहिला तर राज्यात मुलींमध्ये दुसरी मेरिट आले. बारावीत क्लासेसला सायकलने जायचे, तेव्हा कुणाचीही सोबत नव्हती. बारावीनंतर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसमध्ये प्रवेश घेताना वडील फीचे पैसे देण्यास तयार नव्हते. त्याकरिता मामांनी मदत केली. वैद्यकीय शिक्षण अत्यंत जिद्दीने पूर्ण केले. एमबीबीएसची पदवी सुवर्णपदकासह मिळविली. लग्नानंतर पती डॉ. सुरेश चवरे आणि कुटुंबीयांनी आयएएस होण्यासाठी सहकार्य केले. गायनिकमध्ये एमडी पूर्ण केले नाही. पण वर्ष-२००७ मध्ये आयएएस झाले. त्यावेळी महाराष्ट्रात टॉपर तर अखिल भारतीय स्तरावर २९ वी रँक मिळाली. त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मनरेगा आयुक्त, भंडारा जिल्हाधिकारी, अतिरिक्त आदिवासी आयुक्त या पदावर कार्य केले. या पदांवर कार्यरत असताना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत महिलांना प्रतिष्ठा प्राप्त होत नाही. देशात मातेचे पूजन होते. आईनंतर स्त्रीला सन्मान मिळावा, अशी संवेदनशीलता समाजात नाही. आता कुठल्याही कार्यालयात महिला नोकरदारांची संख्या वाढली आहे. पण काम करताना पुरुषांचा अहंकार आडवा येतो. पुरुष सहकारी त्यांना चांगली वागणूक देणार नाही, तोपर्यंत कार्यालयातील काम सुरळीतपणे होणार नाही. मुलींना आरक्षणाची गरज नाही. त्याचा टक्का वाढला आहे. जे हातात आले, त्याचे सोने बनविण्याची ताकद असल्याचे डॉ. माधवी खोडे यांनी सांगितले.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिन