शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी महिला तक्रार विशेष दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 12:32 IST

महिला, मुलींच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांनी आणखी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास महिला तक्रार विशेष दिवस हा उपक्रम सुरू केला जाणार आहे.

ठळक मुद्देएसीपी, डीसीपी तक्रारी ऐकतीलतात्काळ सुरक्षा उपलब्ध करून देण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला, मुलींच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांनी आणखी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास महिला तक्रार विशेष दिवस हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. प्रत्येक महिन्यात दुसºया व चौथ्या मंगळवारी हा उपक्रम राबविला जाणार असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस आयुक्त तसेच पोलीस आयुक्त स्वत: महिला-मुलींच्या तक्रारी ऐकणार आहेत. त्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जाणार असून, त्यांना कसा दिलासा मिळेल, त्यासाठी उपाय केले जाणार आहेत.हे (नागपूर) माझे शहर आहे. ते सर्वात सुरक्षित असून, येथील पोलीस माझ्या सुरक्षेसाठी, मदतीसाठी तत्पर आहे, अशी भावना उपराजधानीतील महिला-मुलींमध्ये निर्माण करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी हा उपक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे. महिन्यातील दुसºया आणि चौथ्या मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत महिला तक्रार विशेष दिवस आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी आलेल्या महिला-मुलींच्या तक्रारी ऐकून त्याचे प्रभावी निराकरण करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.गृहराज्यमंत्र्यांकडून प्रशंसा !शहर पोलिसांनी त्यांच्या व्टिटर अकाऊंटवर या उपक्रमाची माहिती टाकताच गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी रिव्टिट करून ‘एक अत्यंत स्तुत्य उपक्रम’ म्हणून प्रतिक्रिया नोंदवली आहे. या उपक्रमाची माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्याकडे ठिकठिकाणाहून अनेकांनी संपर्कही साधला आहे.होम ड्रॉपचे कौतुकयापूर्वी शहर पोलिसांनी महिला-मुलींसाठी ‘होम ड्रॉप’ हा उपक्रम सुरू केला. तो नागपूरच नव्हे तर राज्यभर प्रशंसेचा विषय ठरला होता. पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांचे राज्यतील अनेक सामाजिक संघटना आणि विशेषत: महिला संघटनांनी कौतुक केले होते. हा उपक्रम राज्यातील ठिकठिकाणच्या शहरात पोलिसांनी सुरू करावा, अशा सूचनाही करण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Policeपोलिस