शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

महिलांची खाती सायबर गुन्हेगारांच्या रडारवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 11:58 IST

cyber crime Nagpur News ऑनलाईन व्यवसाय करण्यात इच्छुक असलेल्या महिलांना सायबर गुन्हेगारांनी ठगवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अशा अनेक प्रकरणांचा उलगडा आता व्हायला लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑनलाईन व्यवसाय करण्यात इच्छुक असलेल्या महिलांना सायबर गुन्हेगारांनी ठगवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अशा अनेक प्रकरणांचा उलगडा आता व्हायला लागला आहे.

दीर्घकाळाची टाळेबंदी आणि अजूनही असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या कारणाने नागरिकांचे उत्पन्न प्रचंड ढासळले आहे. कुटुंबाची दयनीय स्थिती बघून अनेक महिला आर्थिक हातभार लावण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी त्या विना गुंतवणुकीच्या ऑनलाईन बिझनेसमध्ये नशीब आजमावत आहेत. क्षुुल्लक कमिशन मिळविण्यासाठी कपडे, कॉस्मॅटिक, डेकोरेटिव्ह आयटम्ससह स्वयंपाकघरात लागणाऱ्या विभिन्न वस्तूंचे त्या ऑनलाईन ऑर्डर घेत आहेत. महिलांच्या या उदात्त हेतूने घेतलेल्या पुढाकाराला सायबर गुन्हेगारांचे ग्रहण लागत आहे. हे गुन्हेगार दहा किंवा २० उत्पादनांचे ऑर्डर देऊन आधीच पेमेण्ट करण्यास सांगतात. त्याअनुषंगाने संबंधित व्यावसायिक महिलांच्या बँक खात्याची डिटेल्स मिळविण्याचे प्रयत्न करतात.

पेमेंटसाठी मोबाईल नंबर किंवा खाते क्रमांक दिल्यानंतर हे गुन्हेगार तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून क्यूआर कोड पाठवितात. क्यूआर कोड स्कॅन करून संबंधित महिलेला पेमेण्ट करण्यास सांगितले जाते. काही प्रकरणात एटीएम कार्डाच्या दोन्ही बाजूची फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविण्यास सांगितले जाते. या प्रक्रियांना कितीही वेळ लागत असला तरी हे गुन्हेगार मोबाईलद्वारे मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. अडचणीच्या समयी हे अन्य दुसरा क्रमांकही मिळविण्याचा प्रयत्न करतात. अनेक महिलांच्या खात्यांशी त्यांचे आधार, पॅनकार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर लिंक नसतात. त्यामुळेच, ते अनेकदा कुटुंबातील अन्य सदस्यांचा नंबर देण्याची मागणी करत असतात.अकाऊंट डिटेल शेअर करू नका: ऑनलाईन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अशा प्रकारच्या तक्रारी येत असतात. कोणत्याही परिस्थितीत अन्य कुणाशी आपला ओटीपी किंवा पिन नंबर शेअर करू नये. एटीएमच्या मागच्या भागाचा फोटो सुद्धा शेअर करू नये. ओटीपी दिल्याशिवाय पैसे निघत असतील तर तीन दिवसाच्या आत ती रक्कम परत येऊ शकते. कधीकाळी मोबाईलवर खात्याचा केवायसी नसल्याचे सांगितले जात असेल आणि त्याअनुषंगाने ओटीपी पाठविला जात असेल तर ती चुकीची बाब आहे. अनेकदा हे गुन्हेगार विश्वास संपादन करण्यासाठी काही रक्कम खात्यात ट्रान्सफर करू शकतात. परंतु, तरी देखील आपल्या खात्याची डिटेल देणे योग्य नाही.- नदीम अहमद शाह, मुख्य व्यवस्थापक, पीएनबी, किंग्सवे शाखा

 

 

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम