शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर ग्रामीण भागातील महिला चालविणार टॅक्सी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 19:59 IST

ग्रामीण भागातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ नागपूर जि.प.च्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे दिले जात आहे. अल्पशिक्षित असणाऱ्या  महिलांना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बाल कल्याण विभागाने पहिल्यांदाच या प्रशिक्षणाचे आयोजन केले असून, जिल्ह्यात जवळपास ७५० महिला प्रशिक्षण घेऊ शकणार आहे.

ठळक मुद्दे७५० वर महिला घेणार ड्रायव्हिंगचे प्रशिक्षणमहिला सक्षमीकरणासाठी महिला व बाल कल्याण विभागाचा पुढाकार

आॅनलाईन लोकमतनागपूर : ग्रामीण भागातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ नागपूर जि.प.च्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे दिले जात आहे. अल्पशिक्षित असणाऱ्या  महिलांना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बाल कल्याण विभागाने पहिल्यांदाच या प्रशिक्षणाचे आयोजन केले असून, जिल्ह्यात जवळपास ७५० महिला प्रशिक्षण घेऊ शकणार आहे.ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराला प्रवृत्त करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. वैयक्तिक लाभाच्या योजनेतूनही महिलांना पिठाची गिरणी, शिलाई मशीन अनुदानावर दिली जाते. ब्युटी पार्लर, शिवणकामासारखे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार करण्यास महिला व बाल कल्याण विभागातर्फे प्रवृत्त केले जाते. शासनाने पहिल्यांदाच विभागाच्या माध्यमातून महिलांना चारचाकी वाहनांचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. अनुसूचित जातीच्या महिलांसाठी ही योजना राबविण्यात येत असून, जि.प.च्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एक महिन्याचे हे प्रशिक्षण असून, लाभार्थी महिलेचे वय १८ वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे. प्रत्येक तालुक्यात ६० महिलांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून लाभार्थी महिलेचा शोध घेऊन, विभागातर्फे त्यांची निवड करण्यात येणार आहे.ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देणारी संस्था तालुक्यातील मोठ्या गावात जाऊन महिलांना प्रशिक्षित करणार आहे. प्रशिक्षणानंतर वाहन चालविण्याचा परवानादेखील देण्यात येणार आहे. विभागातर्फे लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू असून, पुढच्या महिन्यापासून महिलांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.

शहरातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. ग्रामीण भागात पुरुषांच्या व्यवसायात महिलांचा सहभाग नगण्यच असतो. शासनाने ग्रामीण भागातील महिलांसाठी हा नाविन्यपूर्ण प्रयोग राबवून महिलांना संधी दिली आहे. ग्रामीण भागात महिला व्यवसायात असल्या तरी एक पारंपरिक स्वरूपाचा त्यांचा व्यवसाय असतो. परंतु ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण घेऊन स्वत:चा टॅक्सीचा व्यवसाय करू शकतात.

पुष्पा वाघाडे

 सभापती, महिला व बाल कल्याण विभाग

टॅग्स :Womenमहिलाnagpurनागपूर