शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी घेतला इंटरसिटी, विदर्भ एक्स्प्रेसचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 22:39 IST

जागतिक महिला दिनानिमित्त गुरुवारी दोन रेल्वेगाड्यांचा ताबा महिला कर्मचाऱ्यांनी घेतला. यात नागपूर-भुसावळ इंटरसिटी एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसचा समावेश आहे. या रेल्वेगाड्यांना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता, दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘सिनियर डीसीएम’ अर्जुन सिबल यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

ठळक मुद्देनागपूर स्थानकावर ‘डीआरएम’ने दाखविली हिरवी झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जागतिक महिला दिनानिमित्त गुरुवारी दोन रेल्वेगाड्यांचा ताबा महिला कर्मचाऱ्यांनी घेतला. यात नागपूर-भुसावळ इंटरसिटी एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसचा समावेश आहे. या रेल्वेगाड्यांना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता, दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘सिनियर डीसीएम’ अर्जुन सिबल यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता यांनी रवाना केलेल्या इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये लोकोपायलट म्हणून माधुरी उराडे यांनी तर सहायक लोकोपायलट म्हणून मंजू वैद्य यांनी गाडीचा ताबा घेतला तर गार्डची जबाबदारी पूनम मेश्राम यांनी पार पाडली. गाडीतील इतर महिला कर्मचाऱ्यांमध्ये कंडक्टर वृंदा देसाई, तिकीट तपासणी कर्मचाऱ्यात शालिनी मीना, छाया गर्गे, महानंदा वाटकर यांचा समावेश होता. इंटरसिटी एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी उपस्टेशन व्यवस्थापक दीपाली मानकरे, अनघा मेश्राम यांच्यासोबत पॉर्इंट वूमेन अगस्था फ्रान्सिस उपस्थित होत्या. नागपूर रेल्वे स्थानकावरून सकाळी ७.३० वाजता महिलांद्वारा संचालित इंटरसिटी एक्स्प्रेस रवाना होत असताना वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता (टीआरओ) महेश कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र, स्टेशन संचालक डी. एस. नागदेवे, अधिकारी आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दुसरीकडे सकाळी ९ वाजता मुंबई-गोंदिया-विदर्भ एक्स्प्रेसला वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांनी हिरवी झेंडी दाखविली. विदर्भ एक्स्प्रेसची कमान गार्ड कौशल्या साहू, लोकोपायलट सुनीता चौधरी, सहायक लोकोपायलट स्नेहा सहारे यांच्यासह तिकीट तपासणी कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला यांनी सांभाळली. यावेळी वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता आर. के. पटेल यांच्यासह महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.महिलांना संधी मिळावयास हवीइंटरसिटी आणि विदर्भ एक्स्प्रेसमधील लोकोपायलट, सहायक लोकोपायलट, टीटीई, आरपीएफच्या महिलांशी चर्चा केली असता, महिलांना स्व:तला सिद्ध करण्यासाठी त्यांना संधी मिळावयास हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. आज आम्हाला संधी मिळाली असून, ही संधी आम्ही जबाबदारीने पार पाडू; भविष्यात अशी संधी मिळाल्यास महिला अधिक विश्वासाने आपले कार्य करून रेल्वेला प्रगतिपथावर नेण्यासाठी योगदान देऊ शकतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर