शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलीस सेलमध्ये पुरुष कशासाठी?

By admin | Updated: March 19, 2015 02:26 IST

पोलीस ठाण्यांतील महिला पोलीस सेलची संपूर्ण व्यवस्थाच स्वतंत्र असणे आवश्यक आहे. सेलकरिता वेगळी इमारत किंवा खोली असावी.

नागपूर : पोलीस ठाण्यांतील महिला पोलीस सेलची संपूर्ण व्यवस्थाच स्वतंत्र असणे आवश्यक आहे. सेलकरिता वेगळी इमारत किंवा खोली असावी. पीडित महिलांना कक्षात येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता असावा. सेलमध्ये पुरुषांची ढवळाढवळ होणार नाही याची पूर्ण काळजी घेणे गरजेचे आहे असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी व्यक्त करून सरकारी वकील भारती डांगरे यांना यासंदर्भात २७ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात केवळ महिलांकरिता विशेष पोलीस ठाणे स्थापन करण्यासाठी समाजसेविका नूतन रेवतकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अनंत बदर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, अ‍ॅड. डांगरे यांनी प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस ठाणे स्थापन करणे अशक्य असून त्याऐवजी प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला पोलीस सेल स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक संजयकुमार वर्मा यांचे प्रतिज्ञापत्र सादर केले. १५ जानेवारी २०११ रोजी राज्य शासनाने न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीनुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला पोलीस सेल स्थापन करण्याचा निर्णय घेतला. राज्यात सध्या १०४९ महिला पोलीस सेल कार्यरत आहेत, अशी माहिती प्रतिज्ञापत्रावर न्यायालयाला देण्यात आली. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने वरीलप्रमाणे मत व्यक्त केले. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. समीर सोनवाने यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)काय आहे याचिकाकर्तीचे म्हणणेपुरुष पोलिसांच्या उपस्थितीत पीडित महिलांना तक्रार देण्यास संकोच वाटतो. यामुळे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती पुढे येत नाही. प्रकरणाचा योग्य तपास करणे कठीण होऊन पीडित महिला न्यायापासून वंचित राहते. पोलीस ठाण्यात केवळ महिला पोलीसच राहिल्यास ही समस्या निर्माण होणार नाही. पीडित महिला नि:संकोचपणे तक्रार नोंदवू शकतील. महिला पोलीस महिलांच्या तक्रारीचे गांभीर्य समजू शकतील, असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे.