शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

वाहन चालविण्यात पुरुषांपेक्षा महिलाच ‘परफेक्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 11:00 IST

Nagpur News उपराजधानीत मागील तीन वर्षाची अपघातांची आकडेवारी पाहिली तर महिलाच वाहन चालविण्यात अधिक सजग असल्याचे स्पष्ट होते.

ठळक मुद्देसर्वात कमी महिलांचे अपघाततीन वर्षांच्या आकडेवारीवरुन झाले स्पष्ट

दयानंद पाईकराव

 लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : कोणतेही जोखमीचे काम असेल तर महिला ते काम करण्यास सक्षम नाहीत, असा पूर्वग्रह बाळगला जातो. त्यातल्या त्यात वाहन चालविण्याच्या बाबतीत तर त्यांना सेन्सच नाही, अशी टर उडविली जाते. मात्र पुरुषांपेक्षा महिलाच परफेक्ट वाहनचालक आहेत, असे म्हणावे लागेल. होय, उपराजधानीत मागील तीन वर्षाची अपघातांची आकडेवारी पाहिली तर महिलाच वाहन चालविण्यात अधिक सजग असल्याचे स्पष्ट होते. कारण तीन वर्षात झालेल्या अपघातांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची हानी चारपट अधिक आहे.

उपराजधानीत दरवर्षी हजारावर अपघातांची नोंद करण्यात येते. यात अनेकजण मृत्युमुखी पडतात, तर काही गंभीर जखमी आणि काही किरकोळ जखमी होतात. परंतु २०१९, २०२० आणि २०२१ मध्ये झालेल्या अपघातांकडे नजर टाकली असता महिलांपेक्षा पुरुषांचेच चार पट अधिक अपघात झाल्याचे वाहतूक विभागाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. २०१९ मध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान एकूण १००७ अपघात झाले. यात ४२ महिलांचा मृत्यू झाला तर महिलांच्या पाच पट म्हणजे २०८ पुरुषांचा मृत्यू झाला. २८० महिला जखमी झाल्या तर ७६२ पुरुष जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. २०२० च्या आकडेवारीनुसार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान एकूण ७७३ अपघात झाले. यात २८ महिलांचा आणि १८५ पुरुषांचा मृत्यू झाला तर १७६ महिला जखमी झाल्या असून ५७६ पुरुष जखमी झाल्याची माहिती आहे. २०२१ मध्ये १ जानेवारी ते ३१ मे या पाच महिन्याच्या कालावधीत एकूण ३५० अपघात झाले. यात २६ महिलांचा तर ८५ पुरुषांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जखमींमध्ये ८० महिला आणि २८४ पुरुषांचा समावेश आहे. यावरुन पुरुषांपेक्षा महिलाच अधिक सजग राहून वाहन चालवित असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.

 

 

 

टॅग्स :Womenमहिला