शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी आपले अधिकार जाणून घेण्याची गरज : माधवी खोडे-चवरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 22:18 IST

प्रत्येक क्षेत्रात पुरुषप्रधान संस्कृती आहे. त्यामुळे महिलांनी आपले अधिकार जाणून घेऊन आपल्या अधिकारासाठी लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग संचालनालयाच्या आयुक्त माधवी खोडे-चवरे यांनी केले.

ठळक मुद्देस्वतंत्र मजदूर युनियनतर्फे महिला परिषद

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : संघटित आणि असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांपुढे अनेक समस्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात पुरुषप्रधान संस्कृती आहे. त्यामुळे महिलांनी आपले अधिकार जाणून घेऊन आपल्या अधिकारासाठी लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग संचालनालयाच्या आयुक्त माधवी खोडे-चवरे यांनी केले.स्वतंत्र मजदूर युनियनच्या वतीने वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार, कर्मचारी अधिकाऱ्यांच्या महिला परिषदेत त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लिव्हर ट्रान्सप्लान्ट स्पेशालिस्ट डॉ. मनिषा बांगर, विचारवंत अ‍ॅड. वैशाली डोळस, मुंबईच्या कामगार आयुक्त शिरीन लोखंडे, एम. मनिकल, महापारेषणच्या मुख्य अभियंता जुईली वाघ, संघमित्रा ढोके उपस्थित होत्या. माधवी खोडे-चवरे म्हणाल्या, फुले, आंबेडकरी विचारात माणुसकीची एकता आहे. ही एकता टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र राहण्याची गरज आहे. महिलांसाठी प्रत्येक कार्यालयात विशाखा कमिटी आहे. महिलांनी कुठलाही त्रास सहन न करता आपल्या अधिकारासाठी जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी केले. शिरीन लोखंडे म्हणाल्या, कामगार चळवळीत बहुजन समाजाचे खूप कमी नेते आहेत. त्यामुळे स्वतंत्र मजदूर युनियनचे महत्त्व असून, कामगारांनी अशा संघटनेच्या पाठीशी राहण्याची गरज आहे. डॉ. मनिषा बांगर म्हणाल्या, असंघटित असल्यामुळे महिला कामगारांपुढे अनेक समस्या असतात. विदेशात किमान वेतन न मिळाल्यास सर्वजण लढा देतात. भारतात अशी स्थिती नाही. भारतातील कामगार जातीपातीत वाटल्या गेले आहेत. त्यामुळे सर्वांनी आंबेडकर, फुले, अण्णाभाऊ साठे यांचे कामगारांबाबतचे विचार जाणून घेण्याची गरज आहे. संघटित झाल्यासच कामगारांचे प्रश्न सुटतील, असे आंबेडकरांनी म्हटले होते. त्यामुळे कामगारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांची पुस्तके वाचण्याची गरज आहे. याशिवाय संघटित क्षेत्रातील महिलांनी असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविकातून एन. बी. जारोंडे यांनी संघटना २२ राज्यात कार्यरत असल्याचे सांगून, विषम व्यवस्थेचे बळी ठरलेल्या कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संघटना देशात कार्यरत असल्याचे सांगितले. अ‍ॅड. वैशाली डोळस यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे महिलांकरिता कार्य या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. संचालन निशा चौधरी, मीनाक्षी भिवगडे यांनी केले. आभार संस्कृती रहाटे यांनी मानले. कार्यक्रमाला महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टॅग्स :Womenमहिलाnagpurनागपूर