नागपूर : जनसामान्यांचा विश्वास संपादन करणारी ‘आपला परिवार, आपली संस्था’ हे ब्रीदवाक्य असलेली तसेच विश्वासाचे २६ वर्ष पूर्ण करून २७ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करणारी दि धरमपेठ महिला मल्टीस्टेट को. ऑप. संस्थेतर्फे रामनवमीच्या शुभमुहूर्तावर खास महिलांकरिता कमी व्याजदरावर त्यांचे स्वत:चे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता ‘होम लोन योजना’ ७ टक्के दराने सुरू करण्यात येणार आहे. योजनेत महिलांना फ्लॅट, घर व बंगला खरेदी करण्याकरिता ७५ लाखांपर्यंत ७ टक्के व्याजदराने कर्जाचे वाटप करण्यात येणार आहे. कर्जाची परतफेड करण्याचा अवधी १८० महिने असून कर्जाची मासिक परतफेड रिड्युसिंग व्याजदराने करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा नीलिमा बावणे यांनी सांगितले. या कर्जासंदर्भातील इतर माहिती संस्थेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असून होम लोन योजनेचा लाभ जास्तीत जास्त सभासदांनी घेऊन आपल्या नवीन घराचे स्वप्न पूर्ण करावे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये संस्थेने एकूण २,०३५ कोटींचा व्यवसाय केला असून याकरिता सर्व खातेधारक, भागधारक व शुभचिंतकांचे आभार मानले आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावमुळे सध्या परिस्थिती कठीण आहे. त्यामुळे संस्थेने आपल्या खातेदारांसाठी नगदी किंवा चेकचे व्यवहार (कॅश काऊंटर) सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. ज्यामध्ये नगदी किंवा चेक जमा व विड्रॉलचे व्यवहार करू शकतील. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना घरपोच विड्रॉलची सुविधा प्रदान करण्यात येणार आहे. (वा.प्र.)
रामनवमीच्या शुभमुहूर्तावर महिलांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST