लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पतीचा सीपीएफ निधी देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ऑनलाईन ३१ हजार रुपयाने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माही शर्मा राय दिल्ली आणि कथित सिनिअर ऑफिसर असे आरोपीचे नाव आहे.फिर्यादी सीमा प्रफुल्ल खानखोजे (५२) या गावंडे ले-आऊट स्नेहनगर येथे राहतात. २३ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता सीमा खानखोजे यांना त्यांच्या घरच्या लॅण्डलाईनवर फोन आला. समोरच्या व्यक्तीने माही शर्मा असे स्वत:चे नाव सांगितले. सीआयएफ ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून सीमा यांच्या दिवंगत पतीच्या सीपीएफ खात्यात ३ लाख १० हजार ६४८ रुपये शिल्लक असल्याचे सांगितले. ही रक्कम सीमा यांना मिळू शकते असे आमिष दाखविले. यानंतर २४ एप्रिल रोजी पुन्हा माहीच्या एका कथित सिनियर अधिकाऱ्याने फोन केला. ही रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यापूर्वी इन्कम टॅक्सचे ३१ हजार ६४ रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादीने ३१ हजार रुपयाची रक्कम आपल्या बँक खात्यातून एनएफटीच्या माध्यमातून आरोपींनी सांगितलेल्या खात्यात ट्रान्सफर केली. परंतु तेव्हापासून आरोपीचा फोन बंद दाखवत आहे. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात अल्यावर त्यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पतीचा सीपीएफ निधी देण्याच्या नावावर महिलेची ऑनलाईन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 22:20 IST
पतीचा सीपीएफ निधी देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ऑनलाईन ३१ हजार रुपयाने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पतीचा सीपीएफ निधी देण्याच्या नावावर महिलेची ऑनलाईन फसवणूक
ठळक मुद्देनागपूरच्या प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल