शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खुन करून पळणाऱ्या महिलेस साथीदारासह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:43 IST

मुंबईत वृद्ध दाम्पत्याचा खुन करून रेल्वेने फरार झालेल्या महिलेस तिच्या साथीदारासह नागपूर रेल्वेस्थानकावर गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. ही कारवाई नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.

ठळक मुद्देगीतांजली एक्स्प्रेसमधील घटना : लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबईत वृद्ध दाम्पत्याचा खुन करून रेल्वेने फरार झालेल्या महिलेस तिच्या साथीदारासह नागपूर रेल्वेस्थानकावर गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. ही कारवाई नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.पार्वती खाता (२८) व सिंघासन मुकुट एक्का (३३) दोन्ही रा. ओडिशा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास विमानाने त्यांना मुंबईला नेण्यात आले. मुंबईतील खार पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाºया गोपाळदास मखिजानी (८५) आणि दया माखिजानी (८०) यांचा मुलगा विदेशात राहतो. त्यांचे वय पाहता घरकामासाठी मोलकरीन आणि सांभाळ करण्यासाठी एक महिला होती. त्यांनी अलीकडेच त्या महिलेला कामावर ठेवले होते. गुरुवारी सकाळी कामासाठी आलेल्या बाईने बेल वाजविली असता आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हे हत्याकांड उघडकीस आले. मखिजानी दाम्पत्याकडे पंधरा दिवसांपूर्वी ओडिशातील एक महिला कामाला लागली होती. खुनानंतर ही महिला बेपत्ता असल्याने तिच्यावर संशय आला. ही महिला रेल्वेने पळून जाण्याची शक्यता असल्याने लोहमार्ग पोलीस तसेच आरपीएफला सूचना देण्यात आली होती. नागपुरात लोहमार्ग पोलिसांचे पथक मुंबईवरून येणाºया गाड्यांची तपासणी करीत होते. गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास गीतांजली एक्सप्रेस नागपूरला आली. या गाडीच्या मागील जनरल कोचमध्ये मुंबई पोलिसांनी केलेल्या वर्णनाशी मिळतीजुळती महिला आढळली. लोहमार्गचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय पान्हेकर यांना शंका आल्यामुळे त्यांनी त्या महिलेला व तिच्या सोबतच्या तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीत त्या दोघांनीच खारमधील वृद्ध दाम्पत्याची हत्या केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे नागपूर लोहमार्ग पोलिसांनी त्यांना अटक करून खार पोलिसांना याबाबत माहिती दिली. मुंबईचे पोलीस नागपुरला आल्यानंतर ते दोन्ही आरोपींना घेऊन मुंबईला रवाना झाले.बारा लाखाची बॅग गाडीतचलोहमार्ग पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. मात्र, या धावपळीत त्यांची बॅग गितांजली एक्स्प्रेसमध्ये राहून गेली. या बॅगमध्ये मिखजानी यांच्याकडील जवळपास १२ लाखांचा ऐवज होता. दोघांनाही ठाण्यात आणल्यानंतर बॅग गाडीतच असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे गोंदिया लोहमार्ग पोलीस ठाण्याचे ठाणेदार ज्ञानेश्वर नालट यांनी ही बॅग ताब्यात घेऊन नागपूरला पाठविली.

टॅग्स :MurderखूनArrestअटक