शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

स्त्री घराचा मुख्य कणा : कांचन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 22:54 IST

घर कसे सांभाळायचे हे स्त्रीच्या हातात असते. कारण ती घराचा मुख्य कणा आहे, असे मत व्यक्त करत युवा पिढीच्या समस्या जाणून घ्या आणि त्यांना वेळ द्या, असे आवाहन कांचन गडकरी यांनी केले.आयआरसीच्या परिषदेसाठी देशभरातून हजारो पाहुणे आले आहेत. त्या पाहुण्यांच्या पत्नींना परिसरात विरंगुळा मिळावा म्हणून वूमेन कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीचे विविध उपक्रमांचे उद्घाटन कांचन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देआयआरसीच्या महिला कमिटीच्या उपक्रमांचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घर कसे सांभाळायचे हे स्त्रीच्या हातात असते. कारण ती घराचा मुख्य कणा आहे, असे मत व्यक्त करत युवा पिढीच्या समस्या जाणून घ्या आणि त्यांना वेळ द्या, असे आवाहन कांचन गडकरी यांनी केले. 

आयआरसीच्या परिषदेसाठी देशभरातून हजारो पाहुणे आले आहेत. त्या पाहुण्यांच्या पत्नींना परिसरात विरंगुळा मिळावा म्हणून वूमेन कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीचे विविध उपक्रमांचे उद्घाटन कांचन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, श्री लोकसेवा जगदंबा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योती बावनकुळे, शारदा बडोले, मीनल येरावार, गौरी जोशी, अनघा सगणे, स्वाती किडे यांचेसह समितीचे अध्यक्ष सुचिता देबडवार, समितीचे उपाध्यक्ष अर्चना नवघरे उपस्थित होते. यावेळी कांचन गडकरी यांनी समाजातील कर्तृत्ववान महिलांचे उदाहरण देत उपस्थितांना प्रेरित केले.आदिवासी गोंडी संस्कृतीच्या नृत्याने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पाथ ब्रेकिंग आॅफ इंडियन वूमेन या विषयांतर्गत भारतातील प्रेरणादायी महिलांवरील चित्रफित सादर करण्यात आली. कार्यक्रमाला देशभरातील महिला हजर होत्या. त्यांना हळदी कुंकू देत ओटी भरण्यात आली. आनंदी घरडे या चिमुकलीने नृत्य सादर केले.‘सोनू तुला इंजिनियरवर भरोसा नाही का? 
बांधकाम क्षेत्राशी संंबधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जीवन हे अतिशय व्यस्त असते. त्यांच्या जीवनाचे विविध पैलू तसेच रस्त्याच्या बांधकामातून समाजाच्या जीवनात कसे बदल घडून आले. त्यात इंजिनियरची भूमिका कशी महत्त्वाची आहे, हे पटवून देणारे सोनू तुला इंजिनियरवर भरोसा नाही का? या नाटकाद्वारे महिला अधिकारी आणि त्यांच्या पत्नींनी पटवून दिली. गडकरी यांनी स्वत: हे नाटक पाहिले. सुचिता देबडवार, संगीता होतवानी, स्मिता बोरकर, शेफाली कुंदरवार, वैशाली गोडबोले, सीमा देव, पल्लवी उरकुडे, भारती कुंभलकर व क्षिप्रा महाजन आदींचा या नाटकात सहभाग होता.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाcultureसांस्कृतिक