शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावर महिलेने दिला बाळाला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 21:01 IST

छत्तीसगड एक्स्प्रेसने नागपुरात आलेल्या एका महिलेला शुक्रवारी रात्री ११ वाजता प्रसुती वेदना सुरू झाल्या. अशातच तिने मेन गेटजळ एका बाळाला जन्म दिला. तिच्या जवळ कपडे नव्हते. अखेर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिला आर्थिक मदत करून मेयो रुग्णालयात दाखल केले.

ठळक मुद्देगरीब परिस्थिती पाहून रेल्वे कर्मचाऱ्यांनी केली आर्थिक मदत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : छत्तीसगड एक्स्प्रेसने नागपुरात आलेल्या एका महिलेला शुक्रवारी रात्री ११ वाजता प्रसुती वेदना सुरू झाल्या. अशातच तिने मेन गेटजळ एका बाळाला जन्म दिला. तिच्या जवळ कपडे नव्हते. अखेर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिला आर्थिक मदत करून मेयो रुग्णालयात दाखल केले.रुकसाना (३५) रा. सालेकसा ही महिला छत्तीसगड एक्स्प्रेसने नागपुरात आली. तिच्यासोबत तिची आई राबिया होती. संबंधित महिलेस प्रसुतीवेदना होत होत्या. प्लॅटफार्म क्रमांक २/३ वर ड्युटीवर असलेले उपनिरीक्षक एस. पी. सिंह यांनी तिची चौकशी केली. तिने आपले नाव रुकसाना (३५) रा. सालेकसा, गोंदिया सांगितले. तेवढ्यात आरपीएफचा जवान विकास शर्मा तेथे आला. महिलेची प्रकृती बाहून बॅटरी कार मागवून महिलेस बॅटरी कारमध्ये बसविण्यात आले. तिला रुग्णालयात नेण्यात येत असताना मेन गेटजवळ महिलेच्या प्रसुती वेदनात वाढ झाली. बॅटरी कार थांबवून आरपीएफच्या महिलांना पाचारण करण्यात आले. विनिता ढिल्लो, कविता कृपाले, रचना आणि गीता कश्यप यांनी महिलेस बॅटरी कारमधून उतरवून प्रसुतीसाठी मदत केली. त्यानंतर आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक बी. एस. बघेल, संतोष पटेल, विवेक कनोजिया घटनास्थळी आले. उपस्टेशन व्यवस्थापक दत्तू गाडगे यांनी रुग्णवाहिका बोलावली. काही वेळानंतर रेल्वेचे डॉक्टर, नर्स मेन गेटजवळ पोहोचले. थोड्याच वेळात महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर या महिलेस उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपस्टेशन व्यवस्थापक, कुली, जवानांनी दाखविली माणुसकीप्रसुती झाल्यानंतर महिलेजवळ बाळाला ठेवण्यासाठी कपडेही नव्हते. ती अतिशय गरीब कुटुंबातील होती. तिची परिस्थिती पाहून घटनास्थळी उपस्थित उपस्टेशन व्यवस्थापक दत्तू गाडगे, आरपीएफचे जवान, कुली, ऑटोचालक यांनी पैसे गोळा करून या महिलेस मदत केली.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरnagpurनागपूर