लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय योजनेतून घरकूल मिळवून देतो आणि दोन्ही भावांना नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका महिलेकडून आरोपी सतीश रामकृपाल बघेल (वय ४४, रा. पंचवटीनगरी) याने १ लाख १० हजार रुपये हडपले. प्रतिभा आकाश गायकवाड (वय ३४) असे तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे.गायकवाड यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांजीहाऊस चौकात राहतात. आरोपी सतीश बघेल याच्याशी गायकवाड यांची ओळख आहे. त्याचा गैरफायदा उठवत आरोपी बघेलने त्यांना आधी घरकूल योजनेचा लाभ मिळवून देतो, असे आमिष दाखवून १५ जानेवारी २०१९ ला ६० हजार रुपये घेतले. त्यानंतर तुमच्या दोन्ही भावांना नोकरी लावून देतो, असे सांगून ५० हजार रुपये घेतले.एकूण १ लाख १० हजार रुपये हडपणाऱ्या बघेलने नंतर गायकवाड यांना टाळणे सुरू केले. वेगवेगळी कारणे सांगून तो त्यांना काही दिवसांनी काम होईल, असे म्हणत होता. नऊ महिने होऊनही घरकूल अथवा नोकरी असे दोनपैकी कोणतेच काम पूर्ण न केल्यामुळे गायकवाड यांना संशय आला. त्यांनी आरोपीला आपली रक्कम परत मागितली असता, त्याने रक्कम देण्यासही टाळाटाळ केली. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे गायकवाड यांनी यशोधरानगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.मोहल्ल्यात नेतागिरी, अनेकांची फसवणूक?आरोपी बघेल यशोधरानगरातील अनेक मोहल्ल्यात नेतागिरी करतो. आपले याच्याशी संबंध आहे, त्याच्याशी संबंध आहे, असे सांगून तो गरीब, निरक्षर नागरिकांसमोर शेखी मिरवतो. गायकवाड यांच्यासारखीच अनेकांकडून आरोपी बघेल याने रक्कम घेतली असावी, असा पोलिसांना संशय आहे. त्यासंबंधाने पोलीस त्याची चौकशी करीत आहेत.
घरकूल आणि नोकरीचे आमिष दाखवून महिलेस १ लाख १० हजाराने लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:02 IST
शासकीय योजनेतून घरकूल मिळवून देतो आणि दोन्ही भावांना नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका महिलेकडून १ लाख १० हजार रुपये हडपले.
घरकूल आणि नोकरीचे आमिष दाखवून महिलेस १ लाख १० हजाराने लुबाडले
ठळक मुद्देनागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल