शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पाण्यासाठी वाक्युद्ध

By admin | Updated: April 11, 2017 01:42 IST

महानगरपालिकेच्या शहरातील पाणीटंचाईची आढावा बैठक सोमवारी चांगलीच गाजली. या बैठकीत जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांची कोणतीच तयारी नसल्याचे दिसले.

विरोधकांनी फोडले माठ : सत्ताधाऱ्यांनी आपटले डोके पालकमंत्र्यांनी फोडला अधिकाऱ्यांना घामनागपूर : महानगरपालिकेच्या शहरातील पाणीटंचाईची आढावा बैठक सोमवारी चांगलीच गाजली. या बैठकीत जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांची कोणतीच तयारी नसल्याचे दिसले. तसेच ओसीडब्ल्यूबाबत समोर आलेल्या तक्रारी पाहता ओसीडब्ल्यूचे कामही समाधानकारक नसल्याचे आढळून आल्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदारांसह लोकप्रतिनिधींनी या बैठकीत अधिकऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच त्यांच्या एकूणच कारभाराबाबत नापसंती व्यक्त केली.एकूणच नागपुरात सत्ताधारी व विरोधी पक्षाचा पाणीटंचाईबाबत असंतोष दिसून आला. एकीकडे विरोधी पक्षातर्फे महापालिकेत मडके फोडण्यात आले तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीला महापौर नंदा जिचकार, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्याच्या दृष्टीने जलप्रदाय विभागाकडे कोणतीच माहिती उपलब्ध नव्हती. कार्यकारी अभियंता गायकवाड समाधानकारक माहिती देऊ शकले नाही. पाणीटंचाईच्या उपाययोजना काय केल्या, हेही जलप्रदाय विभागाचे अधिकारी सांगू शकले नाही. परिणामी आ. सुधाकर देशमुख यांनी नाराजी व्यक्त करीत ही बैठक पुन्हा बोलावण्याची सूचना केली. या बैठकीत उपस्थित झोन सभापतींनीही पाणीटंचाईच्या तक्रारी केल्या. खुद्द जलप्रदाय समिती सभापतींच्या प्रभागातच दूषित पाणी असल्याचे पुरावे पालकमंत्र्यांकडे देण्यात आले.ओसीडब्ल्यू करारानुसार काम करीत नसल्याचे या बैठकीत पालकमंत्र्यांना आढळले. मनपा जलप्रदाय विभाग आणि ओसीडब्ल्यू दोघांचेही पाणीटंचाईच्या दृष्टीने कोणतेच नियोजन नसल्याचे दिसून येत होते. पाईपलाईनचे नेटवर्क आहे, तेथे पाणी पोहोचत नाही. ६५० एमएलडी पाणीपुरवठा शहराला होत असतानाही अनेक प्रभागात पाणीटंचाईच्या तक्रारींवर पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.(प्रतिनिधी)महापौरांनीही व्यक्त केली नाराजी महापौर नंदा जिचकार यांनीही मनपा जलप्रदाय विभागाच्या कामावर नापसंती व्यक्त केली. ओसीडब्ल्यूवर कारभार सोपवून कर्मचारी निश्चिंत असतात. आपली काही जबाबदारी नाही, या थाटात जलप्रदाय विभाग वागत असल्याची टीकाही त्यांनी केली. आ. डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे व नगरसेवक दीपक चौधरी प्रचंड संतप्त झाले होते. ओसीडब्ल्यूच्या कामाचे होणार अंकेक्षण ओसीडब्ल्यूच्या कामाचे त्रयस्थ संस्थेकडून अंकेक्षण करण्याचा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला. यापुढची पाणीटंचाईची बैठक २५ एप्रिलला आयोजित करण्याचे निर्देशही पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. लोकांच्या तक्रारी ऐका, अन्यथा कडक कारवाई लोकांना पाणी वितरणाचे कंत्राट ओसीडब्ल्यूकडे असले तरी ओसीडब्ल्यूवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जलप्रदाय विभागाच्या अभियंत्यांची आहे. कनिष्ठ व उपअभियंत्यांनी उद्यापासून वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांच्या पाण्यासंदर्भातील तक्रारी सोडवाव्यात. लोकांच्या तक्रारी सोडवल्या गेल्या नाहीत तर प्रत्येक अभियंत्यावर कडक कारवाईचा इशारा पालकमंत्र्यांनी याप्रसंगी दिला. तसेच आयुक्तांनी झोननिहाय पाणीटंचाईसाठी दौरा करावा व नगरसेवकांना सोबत घेऊन नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.काँग्रेसचा मनपावर हल्लाबोलनागपूर : ऐन उन्हाळ्यात शहराच्या अनेक भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी व निवेदने देऊ नही नागरिकांना पाणीपुरवठा होत नसल्याने सोमवारी काँग्रेसतर्फे महापालिका कार्यालयावर हल्लाबोल केला. आंदोलकांनी कार्यालयाच्या गेटवर व महापौरांच्या कक्षात माठ फोडून संताप व्यक्त केला. शहरातील सर्व भागातील नागरिकांना मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा. यासाठी आॅरेंज सिटी वॉटर वर्क्सला (ओसीडब्ल्यू) कंत्राट देण्यात आला. ओसीडब्ल्यूने शहराच्या विविध भागात पाण्याची लाईन टाकण्याचे काम केले. त्यानंतरही उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शहराच्या अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईची समस्या मार्गी लागावी, यासाठी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर व अ‍ॅड. अभिजित वंजारी आदींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. ओसीडब्ल्यू कंपनीने शहरात पाण्याची लाईन टाकून नवीन मीटर बसविले. परंतु त्यानंतरही काही भागात २० मिनिटेच पाणी मिळत आहे. दुसरीकडे कंपनीचे कर्मचारी वाढीव बिल पाठवून कमी करण्यासाठी पैशाची मागणी करीत आहे. वाढीव बिल न भरल्यास तीन दिवसात नळ जोडणी खंडित करण्याची नोटीस बजावली जात आहे. महापालिका व पदाधिकाऱ्यांचा शहरात २४ तास पाणीपुरवठा होत असल्याचा दावा फोल ठरत आहे. यामुळे ओसीडब्ल्यू कंपनीचा कंत्राट रद्द करण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी विकास ठाक रे, संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महापौर नंदा जिचकार व आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनातून केली. पाणी टंचाईची समस्या सोडविण्याचे निर्देश ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना देण्यात येईल. तसेच झोननिहाय आढावा घेण्याचे आश्वासन नंदा जिचकार यांनी शिष्टमंडळाला दिले. आंदोलनात माजी उपमहापौर अण्णाची राऊत, नगरसेवक मनोज सांगोळे, परसराम मानवटकर, हर्षला साबळे, भावना लोणारे, नेहा निकोसे, स्नेहा निकोसे, रमेश पुणेकर, दर्शना धवड, दिनेश यादव, माजी नगरसेवक प्रशांत धवड, देवा उसरे, रमण पैगवार, किशोर गजभिये, वासुदेव ढोके, दिनेश तराळे, शीतल घरत, प्रवीण आगरे, अमान खान, इर्शाद शेख, पंजक निघोट, जॉन थॉमस, काँग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)