शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
2
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
3
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
4
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
5
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
6
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
7
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
8
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
9
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
10
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
11
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
12
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
13
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
14
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
15
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
16
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
17
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
18
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
19
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
20
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...

‘सर्जा-राजा’शिवाय शेतीत जिवंतपणा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2016 03:06 IST

शेतात राबताना शेतकऱ्याला सदैव त्याच्या सर्जा-राजाची सोबत होती. नांगरणी, वखरणी करताना त्याला रागावणे.

निशांत वानखेडे नागपूरशेतात राबताना शेतकऱ्याला सदैव त्याच्या सर्जा-राजाची सोबत होती. नांगरणी, वखरणी करताना त्याला रागावणे. उसंत मिळाली की त्याला चारा घालून नंतरच स्वत:च्या पोटात भाकरी घालताना त्याचे प्रेम दिसायचे. दिवसभर शेतात काम करताना या नि:शब्द सोबत्यासोबत त्याच्या सुखदु:खाच्या गोष्टी चालयच्या. राग, लोभ सार काही त्याला सांगणे असायचे. काळ बदलला. लोखंडी यंत्रानी शेतीत शिरकाव केला आणि या मित्राची सोबत कमी झाली. मात्र या जिवलग मित्राशिवाय शेतकऱ्याच्या जगण्यात राम नाही. सर्जा-राजाशिवाय शेतीत जिवंतपणा नाही. पोळ्याच्या खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना गहन अर्थ सांगणाऱ्या आहेत. पोळा सणात बैल हा केंद्रबिंदू असला, तरी त्याचा आशय व्यापक अर्थाने पशुधनाबाबत आहे. वर्षभर आपल्या कारभाऱ्याच्या बरोबरीने मेहनत करणारा, त्याच्या सुख-दु:खाचा साथीदार असलेला बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र. या मित्राने आपल्या कुटुंबासाठी केलेल्या ऋणातून उतराई होण्यासाठी पोळ्याचे महत्त्व. एक मित्र म्हणून पशुप्रेमाचे हे अनोखे उदाहरण जगात न सापडणारे आहे. काळ बदलला. यांत्रिकीकरणाचं युग अवतरलं. बैलाच्या जागी ट्रॅक्टर आला. दिवसागणिक ट्रॅक्टरांची संख्या वाढू लागली. कधीकाळी जनावरांनी समृद्ध असलेल्या दावणी, गोठे ओस पडू लागले. ट्रॅक्टरने मेहनत सोपी केली. पण अनेक शेतीमित्रांना शेतीतून हद्दपार केले. शेतात राबणारे बैल, दुभत्या गाई, म्हशी ही खरी दौलत होती. शेतीची शान होती. सर्जा-राजाह्णची जोडी आणि गाई, म्हशी, शेळ्या असे पशुधन होते, तोवर शेतीमध्ये एक वेगळा जिवंतपणा होता. ही मुकी जनावरे शेतकरी कुटुंबाचे अविभाज्य घटक असायचे. आज हे नि:शब्द नातलग शेतकरी कुटुंबापासून जणू विभक्त झाले आहेत. त्यांची जागा ट्रॅक्टर, हार्वेस्टर, उपनेर अशा यंत्रांनी घेतली. मात्र पूर्वीसारखी भावनिकता येणे शक्य नाही. परंतु आता घड्याळाचे काटे उलटे फिरवता येणार नाहीत. आजचे प्रश्न वेगळे आहेत, आजचा काळ वेगळा आहे आणि परिस्थितीही. त्याला सामोरे जाण्यासाठी कल्पक मार्ग शोधले पाहिजेत, यात दुमत नाही. परंपरेचे धागे विरू न देता ते आव्हान कसे पेलायचे हाच खरा पेच आहे. महाग तरी घेतला सोबत्याचा साजसर्वत्र वाढलेल्या महागाईचे सावट बैलांच्या साजसामानावरही दिसून येत आहे. मात्र कितीही महाग झाले तरी सर्जा-राजाचा साज खरेदी करण्यात शेतकरी मागे नाहीत. कॉटन मार्केट चौक परिसरात असलेल्या पोळ्याच्या खरेदीसाठी शहराच्या आसपास राहणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. येथील एक दुकानदाराने सांगितले की, साजसामानाच्या किमती दरवर्षी १५ ते २० टक्क्यांनी वाढतात. यावर्षीही सामानाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या उत्साहात कमतरता नसल्याचे त्यांनी सांगितले. बाजारात बैलांच्या चौरंग-मटाटे, कासरा, येसन, घुंगराचा पट्टा, झुली, गेरू, रंगाचे शिक्के, गोंडे, मोत्यांच्या, रंगीत दोरखंड, मोराचे पंख, बाशिंग, कवडयांच्या माळा मोठ्या प्रमाणात विक्रीला आल्या आहेत. बैल सजावटीच साहित्य यावेळी चांगलेच महागले आहे. ३०-४० रुपयांपासून ९००-१००० रुपयापर्यंतची साहित्य आहेत. तरीही खरेदीदारांची कमी नाही. शेतकरी हौसेने लाडक्या बैलांसाठी या वस्तूंची खरेदी करीत आहेत. यातील काही शेतकऱ्यांशी लोकमत प्रतिनिधीने संवाद साधला. बैलाचे महत्त्व कमी नाहीआज शेतीची ७५ टक्के कामे ट्रॅक्टर किंवा इतर यंत्रांनी होत असली तरी बैलांची जागा हे यंत्र घेऊ शकत नाही. लहान शेतकऱ्यांना या यंत्राचे भाडे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे बैलांची मदत घ्यावीच लागते. मोठ्या शेतकऱ्यांची कामेही बैलाशिवाय शक्य नाही. त्यामुळे बैलाची एकतरी जोडी अंगणात असली तरच आनंदी वाटते. तो आमचा खरा मित्र आहे. त्यामुळे पोळ्याचा साज कीतीही महागला तरी या उत्सवात कमतरता होणार नाही.- तिलक कन्हेरे, कवडसातो आहे म्हणून आम्ही आहोतबैलजोडी आणि पशुधनाची संख्या कमी झाली म्हणून शेतकऱ्यांच्या जीवनाला अवकळा आली आहे. जीवनभर सोबत राबणाऱ्या या मित्राला म्हातारपणी कसायाला विकण्याचा विचार केला जातो. धन्याने हे पाप करू नये. लोखंडी यंत्र आले तरी बैलाशिवाय काम निघत नाही. तो आहे म्हणून आम्ही आहोत.- मोतीराम पाटील, माहूरझरीमहाग झाला तरी साज आवश्यककोणतेही सण-उत्सव आमच्यासाठी मोठे नाही. मात्र हा सण आमच्या लाडक्या बैलाचा आहे. माझ्याकडे चार एकर शेती आहे व एक बैलाची जोडी आहे. शेतीतील सर्व काम यांच्या मदतीने करतो. बैलजोडी म्हणजे आमचे दैवत आहे. पोळ्याचा साज दरवर्षी महागतो. मात्र हा साज घेतल्याने आणि बैलांना सजविण्यात वेगळा आनंद मिळतो. - गुलाबराव रंदई, हिंगणा