शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसात लुधियानाला पोहोचविले औषध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 12:14 IST

लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. जिल्हा आणि राज्यांच्या सीमाही सील आहेत. परंतु अशा कठीण परिस्थितीत कुठलाही पर्याय नसताना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन लुधियानातील एका गरजू रुग्णाला औषध पोहोचवून कर्तव्यदक्षतेचा परिचय दिला आहे.

ठळक मुद्देगरजू रुग्णाला झाली वेळीच मदतरेल्वे अधिकाऱ्यांची कर्तव्यदक्षता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. जिल्हा आणि राज्यांच्या सीमाही सील आहेत. परंतु अशा कठीण परिस्थितीत कुठलाही पर्याय नसताना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन लुधियानातील एका गरजू रुग्णाला औषध पोहोचवून कर्तव्यदक्षतेचा परिचय दिला आहे.लॉकडाऊनमुळे प्रवासी रेल्वेगाड्या बंद आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पार्सल व मालगाड्या चालविण्यात येत आहेत. अशा कठीण परिस्थितीत लुधियानातील एका रुग्णाला तातडीने औषधांची गरज होती. हा रुग्ण अनिवासी भारतीय आहे. यापूर्वी त्याने औषधे नागपूरहूनच मागविले होते. परंतु लॉकडाऊन असल्याने त्यांची अडचण झाली. नागपुरात राहणारे नातेवाईकही काही करू शकत नव्हते. ही माहिती एका नातेवाईकाने टिष्ट्वटरवरून शेअर केली. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील पार्सल विभागाचे मुख्य पार्सल अधीक्षक शेखर बालेकर यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी लगेच आपल्या वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी मुख्य पार्सल पर्यवेक्षकाला संबंधित नातेवाईकाची तसेच औषधांची माहिती घेण्याची सूचना केली. अलीकडेच चेन्नई ते दिल्लीदरम्यान पार्सल ट्रेन चालविण्यात आली. या गाडीच्या लोकोपायलटकडे औषधे सोपविण्यात आली तसेच पुढच्या चालकाला औषधाबाबत सूचना देण्यास सांगण्यात आले. याच गाडीतून औषधे अमृतसरपर्यंत पोहोचविण्यात आली. तेथून दुसºया पार्सल ट्रेनमधून ही औषधे लुधियानाला पोहचविण्यात आली. नागपूरहून निघालेली औषधे लुधियानातील रुग्णापर्यंत पोहोचण्यास तीन दिवसाचा वेळ लागला. पण इतक्या लवकर औषधे मिळतील अशी अपेक्षा संबंधित रुग्णालाही नव्हती. औषध मिळाल्याने रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी नागपूर रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहे. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndian Railwayभारतीय रेल्वे