शहरं
Join us  
Trending Stories
1
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
2
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
4
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
5
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
6
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
7
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
8
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
9
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
10
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
11
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
12
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
13
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
14
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
15
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
16
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
17
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
18
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
19
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
20
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!

चार वर्षांत ‘पायरसी’साठी उपराजधानीत केवळ सात गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 12:40 IST

२०१४ ते २०१७ या चार वर्षांच्या कालावधीत ‘पायरसी’चा हेतू ठेवल्याप्रकरणी सात जणांविरुद्धच गुन्हे दाखल करण्यात आले. या आकड्यांवर नजर टाकली असता ‘कॉपीराईट’ कायद्याबाबत जनजागृतीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होते.

ठळक मुद्दे‘सायबर क्राईम’ तक्रारींबाबत उदासीनताच‘कॉपीराईट’चा उघडपणे भंग होत असल्याचे ‘ऑफलाईन’ चित्र

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अथक संशोधन व परिश्रमातून तयार झालेल्या बौद्धिक मालमत्तेची वा उत्पादनाची कुणी सहजासहजी नक्कल करू नये साठी ‘कॉपीराईट’ कायद्याचे संरक्षण देण्यात आले आहे. मात्र तंत्रज्ञानाचा उपयोग वाढत असतानाच ‘पायरसी’चे प्रमाणदेखील वाढत असल्याचे दिसून येत आहेत. जागोजागी ‘कॉपीराईट’ कायद्याचा भंग होताना दिसतो. यासंदर्भात राज्यातील प्रशासकीय यंत्रणा व नागरिक या दोहोंमध्येदेखील उदासीनता दिसून येते. २०१४ ते २०१७ या चार वर्षांच्या कालावधीत ‘पायरसी’चा हेतू ठेवल्याप्रकरणी सात जणांविरुद्धच गुन्हे दाखल करण्यात आले. या आकड्यांवर नजर टाकली असता ‘कॉपीराईट’ कायद्याबाबत जनजागृतीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होते. प्रदर्शनाअगोदरच ‘लिक’ होणारे चित्रपट, सहजपणे ‘ऑनलाईन’ उपलब्ध होणारी ‘पायरेटेड कॉपी’ इत्यादी प्रकारच्या ‘सायबर’ गुन्ह्यांची चित्रपट उद्योगाने धास्ती घेतली आहे. परंतु ‘पायरसी’ थांबविण्यासाठी पावले उचलण्यासंदर्भात अद्यापही फारशी पावले उचलण्यात आलेली नाही. शेकडो संकेतस्थळे आणि शहरांपासून ते ग्रामीण भागांत हा उद्योग खुलेआमपणे सुरू असल्याचे दिसून येते. मात्र कारवाईचे प्रमाण नाममात्र असल्यामुळे कुणावरही वचक राहिलेला नाही. ‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार २०१७ साली राज्यभरात ‘सायबर क्राईम’अंतर्गत एकूण ३ हजार ६०४ गुन्हे दाखल झाले. यातील २ हजार १७१ गुन्हे हे विविध प्रकारच्या फसवणुकींसाठी होते. तर अवघे दोन गुन्हे हे ‘पायरसी’च्या हेतूने झाले होते. २०१४ व २०१५ साली हीच संख्या एक तर २०१६ साली तीन इतकी होती.

तक्रारींसाठी पुढाकारच नाहीमागील काही वर्षांपासून ‘पायरसी’मुळे चित्रपट उद्योग तसेच ‘सॉफ्टवेअर्स कंपन्या’ हैराण आहे. अनेकदा सर्वसामान्यांकडूनदेखील कळत-नकळतपणे ‘पायरसी’ केली जाते. मात्र ‘पायरसी’च्या प्रकरणांत जोपर्यंत तक्रार येत नाही, तोपर्यंत पोलिसांकडून कारवाई करण्यात येत नाही. तक्रारकर्त्यांचे प्रमाण नगण्य असते व पोलीसदेखील स्वत:हून पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे ‘पायरसी’अंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी असते. याचा अर्थ ‘पायरसी’चे प्रमाण कमी असते असे नाही, असे मत शहरातील ‘सायबर’ तज्ज्ञांनी व्यक्त केले.

‘कॉपीराईट’ भंग प्रकरणी १६ गुन्हेइंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर ‘कॉपीराईट अ‍ॅक्ट १९५७’चादेखील भंग होताना दिसतो. विविध संकेतस्थळांवर ‘कॉपीराईट’च्या कायद्याअंतर्गत संरक्षित असलेले साहित्य अगदी सहजपणे ‘पीडीएफ’मध्ये उपलब्ध होते. यासंदर्भात अनेकदा प्रकाशकांकडून ओरडदेखील होते. परंतु तक्रारीचे प्रमाण कमी आहे. २०१७ मध्ये संपूर्ण राज्यात ‘कॉपीराईट’ कायदा भंग केल्याप्रकरणी १६ गुन्हे नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे संपूर्ण देशातच यासंदर्भात उदासीनता असून महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम