नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी दिवस-रात्र काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 10:35 AM2019-12-04T10:35:43+5:302019-12-04T10:37:56+5:30

नागपुरातील हिवाळी अधिवेशाची तारीख जाहीर होताच अधिवेशनाच्या तयारीला जोर चढला आहे.

Winter session in Nagpur from 16 st December | नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी दिवस-रात्र काम

नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी दिवस-रात्र काम

Next
ठळक मुद्देसात तारखेपर्यंत आटोपणार काम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील हिवाळी अधिवेशाची तारीख जाहीर होताच अधिवेशनाच्या तयारीला जोर चढला आहे. येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सध्या दिवसरात्र काम सुरू असून येत्या ७ तारखेपर्यंत सर्व तयारी पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
तब्बल महिनाभर चाललेल्या सत्तानाट्या शेवट होऊन राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन भरवण्याची घोषणाही विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
त्यानुसार इकडे अधिवेशनाच्या तयारीला वेग आला आहे. तसे पाहता अधिवेशनाची तयारी गेल्या महिनाभरापासून सुरूच होती. नागभवन, रविभवन येथील मंत्र्यांची निवासस्थानांची रंगरंगोटी व डागडुजीची कामे सुरु होती. ती आता जवळपास झालेली आहे. फर्निचर व वस्तू लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आहेत.
आज सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व कंत्राटदारांची बैठक घेऊन कामासंदर्भात आवश्यक सूचनाही दिल्या.
यात कोणत्याही परिस्थितीत ७ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी दिवस-रात्र काम केले जात आहे.

विधिमंडळातील अधिकारी रविवारी घेणार आढावा
हिवाळी अधिवेशनाच्या तयारी संदर्भातील आढावा घेण्यासाठी मुंबई विधिमंडळातील अधिकारी हे येत्या रविवारी ८ तारखेला नागपुरात येणार असल्याची माहिती आहे. नागपुरातील अधिकारी हे मुंबईतील विधिमंडळ सचिवालयतील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळेच ७ तारखेपर्यंत सर्व कामे आटोपण्याची सर्व कामाला लागले आहेत.

सापांच्या बंदोबस्तांसाठी सर्पमित्रांची मदत
मागच्या अधिवेशनात रविभवन, नागभवन परिसरात मोठ्या प्रमाणावर साप निघाले हांते. मंत्र्यांच्या कॉटेज परिसरातही साप आढळून आले होते. त्यामुळे सापांच्या बंदोबस्तासाठी यावेळी सर्पमित्रांची खास मदत घेण्यात आली आहे.

Web Title: Winter session in Nagpur from 16 st December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.