शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
2
आजचे राशीभविष्य, ०९ डिसेंबर २०२५:आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल
3
भारतीय तांदळावर दुप्पट टॅरिफ लावण्याचे संकेत; अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ट्रम्प संतापले
4
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
5
सोनं झळकलं! वर्षभरात दिले ६७% रिटर्न्स, २०२६ मध्ये १० ग्रॅमचा भाव दीड लाखाच्या पुढे जाण्याचा अंदाज
6
रोजगार नव्हता… आमची लेकरं गोव्याला गेली, आता त्यांचा मृतदेहच परत येतोय; आसाममधील तीन तरुणांचा मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश
7
क्लबमालक लुथरा बंधू थायलंडला पळाले, पोलिसांचा इंटरपोलशी संपर्क; न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी, संशयिताला अटक
8
सारे काही ‘बंगाल’साठी, प्रियांका गांधींचा पलटवार; सरकारला वर्तमान, भविष्यबाबत नाही तर भूतकाळात रस
9
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
11
हॉटेलमध्ये ‘आधार’ची फोटोकॉपी चालणार नाही; पडताळणी थांबवण्यासाठी नवीन नियम करणार
12
आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक
13
धक्कादायक! एका बेडकाने घडविला २ रिक्षांचा अपघात; चालकांसह पाच जखमी; नेमकं काय घडलं?
14
प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
15
'वंदे मातरम्'चे काँग्रेसने तुकडे केले, तुष्टीकरणाचे राजकारण सुरूच : मोदी
16
इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल
17
गोव्यात कसिनोंवरील नाइट ‘जीवघेणा जुगार’; आग लागल्यास माराव्या लागतील मांडवी नदीत उड्या
18
विश्वस्त संस्थांतील विश्वस्त व्यवस्थांचे नियमन करणार, विधेयक सादर, चांगल्या कारभारासाठी तरतूद
19
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
20
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!

By यदू जोशी | Updated: December 9, 2025 05:48 IST

भास्कर जाधव यांना विधानसभेचे, सतेज पाटील यांना विधान परिषदेचे पक्षनेतेपद मिळावे अशी ‘मविआ’ची इच्छा

यदु जोशी

नागपूर : काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचे तर उद्धवसेनेचे अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावे यासाठी सहकार्याची ऑफर भाजपने दिल्याची खात्रीलायक माहिती असून या गुगलीद्वारे महाविकास आघाडीत फूट पाडण्याची भाजपची खेळी असल्याचे म्हटले जात आहे.

उद्धवसेनेचे भास्कर जाधव यांना विधानसभेचे तर काँग्रेसचे सतेज पाटील यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावे अशी मविआची मागणी आहे. जाधव यांच्यासाठी उद्धवसेनेने तर पाटील यांच्यासाठी काँग्रेसने अनुक्रमे विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींना पत्रदेखील दिले आहे.

असे असले तरी भास्कर जाधव यांच्या नावाला महायुतीत असलेल्या शिंदेसेनेने विरोध दर्शविला असल्याचे सूत्रांनी सांगितले. जाधव या पदावर आले तर त्यांचे मुख्य लक्ष्य हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदेसेनेचे मंत्री असतील. मात्र, वडेट्टीवार विरोधी पक्षनेते झाले तर त्यांच्या टीकेचा फोकस महायुतीतील तिन्ही पक्षांवर असेल. त्यामुळे जाधव यांच्यापेक्षा वडेट्टीवार कधीही आपल्या सोईचे असे शिंदेसेनेला वाटत आहे. त्यामुळेच जाधव यांना कोणत्याही परिस्थितीत विरोधी पक्षनेतेपद देऊ नका असा आग्रह शिंदेसेनेने धरला असल्याची माहिती आहे. मित्रपक्षाच्या या दबावानंतर भाजपने वडेट्टीवार आणि अनिल परब यांच्या नावासाठी मविआच्या काही नेत्यांना निरोप धाडल्याची माहिती आहे. विरोधी पक्षनेते निवडीचा अधिकार हा अध्यक्ष, सभापतींना असला तरी सत्तापक्षाची त्यात नेहमीच भूमिका असते असा आजवरचा अनुभव आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मात्र भाजपच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता विधान परिषदेत सतेज पाटील आणि विधानसभेत जाधव यांच्या नावाचाच आग्रह धरायचा अशी भूमिका घेतली. भाजपची खेळी ही आमच्यात फूट पाडण्यासाठी आहे, पण आम्ही ठाम आहोत असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ सदस्याने सांगितले.  पाटील आणि जाधव यांच्याशिवाय दुसरे कोणतेही नाव स्वीकारायचे नाही अशी भूमिका मविआच्या नेत्यांनी घेतली आहे. सतेज पाटील यांना विरोधी पक्षनेते करा या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार सोमवारी सभापती प्रा. राम शिंदे यांना भेटले, मंगळवारी ते पुन्हा भेटणार आहेत.

मी स्पर्धेत नाही : आदित्य ठाकरे

विरोधी पक्षनेतेपदासाठीच्या शर्यतीत मी कुठेही नाही. भास्कर जाधव यांचेच नाव आमच्याकडून दिलेले आहे. माझे नाव समोर करण्याची खेळी ही शिंदेसेनेची आहे, असे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकरांना सांगितले.

तर २०१९ ची पुनरावृत्ती : शंभूराज देसाई

शिंदेसेनेचे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे आहे असे म्हणणारे उद्धव ठाकरे स्वत:च २०१९ मध्ये मुख्यमंत्री झाले होते. आता ऐनवेळी भास्कर जाधव यांचे नाव कापून आदित्य ठाकरेंचे नाव पुढे केले जात असेल तर २०१९ ची पुनरावृत्ती होऊ शकते.

सरकार घाबरत आहे : भास्कर जाधव

शिवसेना उबाठाचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली. प्रचंड बहुमत असतानाही सरकार घाबरत आहे. त्यामुळेच विरोधी पक्षनेतेपद रिकामे ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री आमच्या संख्येची खिल्ली उडवत आहेत. मात्र, केंद्रात भाजप विरोधात असताना त्यांच्याकडे आवश्यक संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते, याचा त्यांना विसर पडला आहे. हे अधिवेशन केवळ पुरवणी मागण्या मंजूर करण्यासाठी बोलाविण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP's Googly: Vadettiwar in Assembly, Parab in Council as Opposition Leaders?

Web Summary : BJP offers opposition leader posts to Congress and Uddhav Sena, aiming to divide Maha Vikas Aghadi. Shinde Sena opposes Jadhav, preferring Vadettiwar. MVA insists on Jadhav and Patil, rejecting BJP's pressure. Thackeray denies competing for the position.
टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनAnil Parabअनिल परबVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार