शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना घराबाहेर पडण्यापासून थांबविण्यासाठी रोडवर उतराल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 23:47 IST

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करताना पोलीस कर्मचारी मानवाधिकाराचे उल्लंघन करीत आहेत, असा आरोप करणाऱ्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दणका बसला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा याचिकाकर्त्याला सवाल : प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करताना पोलीस कर्मचारी मानवाधिकाराचे उल्लंघन करीत आहेत, असा आरोप करणाऱ्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दणका बसला. नागरिकांना घराबाहेर पडण्यापासूनथांबविण्यासाठी आपण १०० सहकाऱ्यांसह रोडवर उतराल का? असा उलट सवाल उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारला व यावर ८ मेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संदीप नायर असे याचिकाकर्त्याचे नाव असून, ते रामदासपेठ येथील रहिवासी आहेत. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. असे असताना नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत. पोलीस अशा नागरिकांवर कान पकडून उठाबशा काढायला लावणे, ‘मी राष्ट्रद्रोही आहे’ असे लिहिलेले फलक हातात देऊन फोटो काढणे व ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणे इत्यादी विविध प्रकारची कारवाई करीत आहे. त्यामुळे मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.न्यायालयाने हे मुद्दे ऐकल्यानंतर याचिकाकर्त्यालाच समज दिली. नागरिकांच्या सुरक्षेकरिता पोलीस दिवस-रात्र एक करीत आहेत. नागरिक त्यांना सहकार्य करण्याचे सोडून घराबाहेर पडत आहेत. अशा परिस्थितीत पोलीस कारवाईवर आक्षेप असेल तर, आपणच १०० सहकाऱ्यांसोबत रोडवर उतरून लोकांना नियंत्रित करण्याची आदर्श पद्धत दाखवून द्यावी, असे न्यायालयाने याचिकाकर्त्याला सांगितले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. चैतन्य काटपुरिया तर, सरकारतर्फे अ‍ॅड. केतकी जोशी यांनी कामकाज पाहिले. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या