नागपूर : चकचकीत रुंद रस्ते, हिरवळ व संत्र्याचे शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. परंतुु अलीकडच्या काळात शहरात ठिक ठिकाणी अवैध पोस्टर्स व बॅनर्स लावले जात असल्याने शहरातील भिंती विदू्रप होत आहेत. यातून सार्वजनिक पर्यटनस्थळेसुद्धा सुटलेली नाहीत. यामुळे स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या शहराचा चेहराच विदू्रप होत आहे. या विरोधात ठोस कारवाई करीत नसल्याने महापालिक ा प्रशासनाला कुंभकर्णी झोपेतून जागे करण्यासाठी आता उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायाधीशांनीच दखल घेण्याची गरज आहे.भिंती व पिलरसोबतच दीक्षाभूमी, गणेश टेकडी मंदिर, ताजाबाद दर्गा अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी अवैध पोस्टर्स व विविध प्रकारचे संदेश लिहिलेले आढळतात. वास्तविक उच्च न्यायालयाने अवैध होर्डिंग्ज, बॅनर व पोस्टर्स विनाअनुमती भिंतीवर लावल्यास संबंधितावर कारवाई करण्याबाबतचे दिशानिर्देश दिलेले आहेत. परंतु या निर्देशाचे पालन केले जात नाही. मुंबई शहरात उच्च न्यायालयाने राजकीय पक्षाना अवैध होर्डिंग्ज, बॅनर्स व पोस्टर लावण्याला प्रतिबंध घातलेले आहेत. त्या धर्तीवर नागपुरातही कार्यवाही होण्याची गरज आहे. अवैध होर्डिंग्ज, बॅनर्स व पोस्टर शहरात लावले जाणार नाही, यासाठी संबंधितावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमानुसार कारवाई केली जाईल. सोबतच लोकांमध्ये या संदर्भात जागरुकता यायला हवी. यासाठी जनजागृतीचीही गरज आहे. या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.- प्रवीण दटके, महापौर
माननीय न्यायमूर्ती आपण दखल घेणार का ?
By admin | Updated: March 29, 2016 03:41 IST