शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शरीरावरील जन्मजात डागामुळे देशसेवेचे स्वप्न भंगणार का?

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: December 9, 2024 12:44 IST

Nagpur : अपात्रतेच्या आदेशाविरुद्ध शेतकरीपुत्राची हायकोर्टात धाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील एका शेतकरीपुत्राने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात धाव घेऊन शरीरावरील जन्मजात डागामुळे देशसेवेचे स्वप्न भंगणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. या शेतकरीपुत्राला केंद्रीय राखीव पोलिस बलाच्या नोकरीकरिता अपात्र ठरविण्यात आले आहे.सिद्धांत तायडे, असे शेतकरीपुत्राचे नाव असून, तो खामगाव येथील रहिवासी आहे. त्याच्या पायावर जन्मजात पांढरा चट्टा आहे. त्यामुळे त्याला २६ ऑक्टोबर २०२४ रोजी अपात्र ठरविण्यात आले आहे. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रकाशित जाहिरातीनुसार सिद्धांतने सीआरपीएफ कॉन्स्टेबल पदाकरिता अनुसूचित जाती प्रवर्गातून अर्ज केला होता. त्यानंतर त्याने लेखी परीक्षा उत्तीर्ण केली व शारीरिक चाचणीतही त्याला पात्र ठरविण्यात आले. परंतु, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा वैद्यकीय तपासणी अहवाल त्याच्या स्वप्नाआड आला आहे. त्यावर सिद्धांतचा आक्षेप आहे.

केंद्रीय गृह विभागाला नोटीस

या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्राथमिक बाबी लक्षात घेता केंद्रीय गृह विभागाचे सचिव, केंद्रीय राखीव पोलिस बलाचे महासंचालक, नागपूर केंद्राचे उप-पोलिस महानिरीक्षक व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था यांना नोटीस बजावून येत्या ५ फेब्रुवारीपर्यंत स्वत:ची बाजू स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. तसेच, अंतरिम आदेश देण्याकरिता याचिकेवर १२ डिसेंबरला सुनावणी निश्चित केली. 

वादग्रस्त आदेश अवैधचॲड. स्वप्निल वानखेडे यांनी न्यायालयासमक्ष सिद्धांतची बाजू मांडताना अपात्रतेचा वादग्रस्त आदेश अवैधच आहे, असा दावा केला. 'अशोक दुखिया' प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाने शरीरावरील जन्मजात डागामुळे उमेदवाराला सशस्त्र दलाच्या नोकरीकरिता अपात्र ठरविले जाऊ शकत नाही, असा निर्णय दिला आहे. तसेच, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि लता मंगेशकर रुग्णालयाने सिद्धांतच्या पायावरील चट्ट्यामुळे दैनंदिन कर्तव्य बजावण्यात कोणताही अडथळा निर्माण होत नाही, असा अहवाल दिला आहे, याकडे ॲड. वानखेडे यांनी हा दावा करताना लक्ष वेधले.

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय