शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

२००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांची जुनी पेन्शन योजना गुंडाळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 11:14 IST

शासनाने १ नोव्हेंबर २०१५ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद केली आहे.

ठळक मुद्देसात शिक्षक आमदारांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाने १ नोव्हेंबर २०१५ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद केली आहे. याच धर्तीवर शासनाने १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. २८ जानेवारीला अवर सचिव शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भातील अभ्यासगटाची बैठक बोलावली होती. यात सर्व सातही शिक्षक आमदारांना बोलावण्यात आले होते.२००५ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजनेत समाविष्ट केल्याने, राज्यभरात वेगवेगळ्या संघटनांकडून या निर्णयाला विरोध करण्यात आला. आता २००५ पूर्वीच्याही शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेपासून बेदखल करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच अभ्यासगट तयार करण्यात आला आहे. यासंदर्भात २८ जानेवारीला बोलाविण्यात आलेल्या बैठकीत सातही शिक्षक आमदार उपस्थित होते. परंतु या बैठकीत कुठलाच निर्णय झाला नसल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे. यासंदर्भात नागपुरातील शिक्षक हेमंत गांजरे यांनी माहितीच्या अधिकारात या बैठकीच्या बाबत शिक्षण विभागाला विचारणा केली. जुनी पेन्शन लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या संयुक्त समितीच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही, असे विभागातर्फे कळविण्यात आले. मात्र या समितीला शासनास शिफारस करण्यासाठी १ मे २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

शिक्षक आमदारांच्या भूमिकेवर संशयशालेय शिक्षण विभागाने २००५ पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी संयुक्त समितीचे गठण करण्यात आले. यात आमदारांचा समावेश करण्यात आला. याची बैठकही अवर सचिवाच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीत शिक्षक आमदारांकडून कुठलीही भूमिका मांडण्यात आली नाही. त्यामुळे बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. शिक्षक आमदारांनीही याची वाच्यता केली नाही. त्यामुळे प्रजासत्ताक शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष हेमंत गांजरे यांनी आमदारांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला.

टॅग्स :Teacherशिक्षक