शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही : सुरेंद्र जैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 21:40 IST

मुस्लिम समाजाचे तुष्टीकरण आता खूप झाले. यापुढे मुस्लिम समाजाला शैक्षणिकच काय तर कुठलेही आरक्षण मिळू देणार नाही. वेळ पडली तर रस्त्यावर उतरू, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त राष्ट्रीय महामंत्री सुरेंद्र जैन यांनी येथे दिला.

ठळक मुद्देबजरंग दलाच्या जाहीर सभेत दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुस्लिम समाजाचे तुष्टीकरण आता खूप झाले. यापुढे मुस्लिम समाजाला शैक्षणिकच काय तर कुठलेही आरक्षण मिळू देणार नाही. वेळ पडली तर रस्त्यावर उतरू, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त राष्ट्रीय महामंत्री सुरेंद्र जैन यांनी येथे दिला.बजरंग दलाचे तीन दिवसीय विदर्भ प्रांत अधिवेशन रेशीमबाग मैदानात सुरू आहे. शनिवारी दुसऱ्या दिवशी रेशीमबाग येथून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेनंतर सायंकाळी चिटणीस पार्क येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला सुरेंद्र जैन मार्गदर्शन करीत होते. यावेळी विहिंपचे विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शेंडे, विदर्भ उपाध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर, देवेश मिश्रा, सुदर्शन शेंडे, हरीश हरकरे, प्रशांत तितरे, नवीन जैन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत असलेले सचिन कावळे व्यासपीठावर होते.राज्यातील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अलीकडेच मुस्लिम समाजाला शिक्षणात ५ टक्के आरक्षण देण्याचा विचार सुरू असल्याचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा धागा पकडून सुरेंद्र जैन यांनी मुस्लिम समाजाला शिक्षणातच नव्हे तर कुठलेही आरक्षण मिळू देणार नसल्याचा इशारा दिला. या मुद्यावर त्यांना उद्धव ठाकरे यांनाही घेरले. यावेळी त्यांनी सीएए कायद्याला विरोध करणारे खरे देशद्रोही असल्याचे सांगितले. गोविंद शेंडे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त करीत, देशातील सर्व समस्यांशी बजरंग दलाचा कार्यकर्ताच लढू शकतो, असे सांगितले. तत्पूर्वी भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी दांडपट्टा, तलवारबाजी, भाला, शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकेद्वारे लक्ष वेधले.प्रास्ताविक बजरंग दलाचे प्रांत संयोजक अ‍ॅड. अमोल अंधारे यांनी केले. संचालन व आभार निरंजन रिसालदार यांनी मानले.उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशी घुसखोरमुक्त करण्याची घोषणा करावीसुरेंद्र जैन यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही प्रहार केले. उद्धव ठाकरे हे खरंच बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार असतील तर त्यांनी बांगलादेशी घुसखोरमुक्त महाराष्ट्राची घोषणा करावी, आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू, असे आव्हानही दिले.शोभायात्रेने वेधले लक्षरेशीमबाग येथून शोभायात्रा काढण्यात आली. यात छत्रपती शिवाजी महाराज, हनुमानजींचे २१ बालस्वरूप, राम दरबार आणि प्रस्तावित राममंदिराची प्रतिकृती लक्ष वेधून घेत होती. रेशीमबाग, महालमार्गे चिटणीस पार्क येथे समारोप झाला.

टॅग्स :Muslimमुस्लीमreservationआरक्षण