शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘मॉरिस’च्या विद्यार्थिनींना दिलासा मिळणार?

By admin | Updated: July 23, 2016 03:17 IST

वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेत (जुने मॉरिस कॉलेज) संस्कृत विभागातील विद्यार्थिनींनी प्राध्यापकाविरोधातच केलेल्या पोलीस तक्रारीमुळे

नागपूर विद्यापीठ : ३ आॅगस्ट रोजी परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय नागपूर : वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेत (जुने मॉरिस कॉलेज) संस्कृत विभागातील विद्यार्थिनींनी प्राध्यापकाविरोधातच केलेल्या पोलीस तक्रारीमुळे विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासंबंधात विद्यापीठाने तसेच महाविद्यालयाने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. ३ आॅगस्ट रोजी परीक्षा मंडळाच्या बैठकीत यावर पुढील निर्णय होणार आहे. या प्रकरणात विद्यार्थिनींवर प्रथमदर्शनी अन्याय झाला असून त्यांना दिलासा देण्यात येऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तक्रारकर्त्या विद्यार्थिनी एम.ए.(संस्कृत) शेवटच्या वर्षात या संस्थेत शिक्षण घेत आहेत. संस्कृत विभागाचे विभागप्रमुख डॉ. ओमकुमार टोम्पे यांच्याकडून वर्षभर चुकीची वागणूक देण्यात आली, असा आरोप विद्यार्थिनींनी केला होता. आपणास मी परीक्षेत अनुत्तीर्ण करील, अशी सातत्याने धमकी टोम्पे यांच्याकडून देण्यात येत होती. मात्र शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या विद्यार्थिनी गप्प बसल्या. परंतु या विद्यार्थिंनींना महाविद्यालयाकडून घेण्यात आलेल्या इंटर्नल परीक्षेत अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर विद्यार्थिनींनी संस्थेचे संचालक डॉ.भाऊ दायदार यांच्याकडे दाद मागितली. तेथूनही तत्काळ कारवाई न झाल्याने मागील महिन्यात विद्यार्थिनींनी पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर नागपूर विद्यापीठाने या प्रकरणाला गंभीरतेने घेतले असून यासंदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली. यासंदर्भात संस्थेकडूनदेखील अंतर्गत चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. विद्यापीठाच्या चार सदस्यीय समितीचा अहवाल तयार झाला असून तो प्रशासनाला सोपविण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या समितीचा अहवालदेखील विद्यापीठाकडे पोहोचला आहे. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांना विचारणा केली असता त्यांनी अहवाल सादर झाले असल्याचे स्पष्ट केले. परंतु अहवालात काय आहे यावर भाष्य करण्यास नकार दिला. ३ आॅगस्ट रोजी परीक्षा मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.(प्रतिनिधी) तक्रारकर्त्या विद्यार्थिनी एम.ए.(संस्कृत) शेवटच्या वर्षात या संस्थेत शिक्षण घेत आहेत. संस्कृत विभागाचे विभागप्रमुख डॉ. ओमकुमार टोम्पे यांच्याकडून वर्षभर चुकीची वागणूक देण्यात आली, असा आरोप विद्यार्थिनींनी केला होता. आपणास मी परीक्षेत अनुत्तीर्ण करील, अशी सातत्याने धमकी टोम्पे यांच्याकडून देण्यात येत होती. मात्र शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या विद्यार्थिनी गप्प बसल्या. परंतु या विद्यार्थिंनींना महाविद्यालयाकडून घेण्यात आलेल्या इंटर्नल परीक्षेत अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर विद्यार्थिनींनी संस्थेचे संचालक डॉ.भाऊ दायदार यांच्याकडे दाद मागितली. तेथूनही तत्काळ कारवाई न झाल्याने मागील महिन्यात विद्यार्थिनींनी पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर नागपूर विद्यापीठाने या प्रकरणाला गंभीरतेने घेतले असून यासंदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली. यासंदर्भात संस्थेकडूनदेखील अंतर्गत चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. विद्यापीठाच्या चार सदस्यीय समितीचा अहवाल तयार झाला असून तो प्रशासनाला सोपविण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या समितीचा अहवालदेखील विद्यापीठाकडे पोहोचला आहे. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांना विचारणा केली असता त्यांनी अहवाल सादर झाले असल्याचे स्पष्ट केले. परंतु अहवालात काय आहे यावर भाष्य करण्यास नकार दिला. ३ आॅगस्ट रोजी परीक्षा मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.(प्रतिनिधी)