शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

‘हेलिकॉप्टर’ उतरवण्यासाठी संंबधित विभागांशी पाठपुरावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 00:17 IST

विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी हेलिकॉप्टरने येण्याची इच्छा दर्शवित याबाबत परवानगी मागणाऱ्या एका भावी उमेदवाराचा अर्ज गांभीर्याने घेत जिल्हा प्रशासनाने याबाबत संबंधित विभागाशी पाठपुरावा करण्यात येईल, तरीपण आपण सुद्धा संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे अर्जदारास कळविले आहे.

ठळक मुद्देत्या अर्जावर जिल्हा प्रशासनाचे उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी हेलिकॉप्टरने येण्याची इच्छा दर्शवित याबाबत परवानगी मागणाऱ्या एका भावी उमेदवाराचा अर्ज गांभीर्याने घेत जिल्हा प्रशासनाने याबाबत संबंधित विभागाशी पाठपुरावा करण्यात येईल, तरीपण आपण सुद्धा संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे अर्जदारास कळविले आहे.एका भावी उमेदवाराला निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी हेलिकॉप्टरने यायची इच्छा आहे. त्यासाठी त्याने रितसर जिल्हा प्रशासनाकडे अर्ज सादर करून कस्तुरचंद पार्क येथे हेलिकॉप्टर उतरवू देण्याची परवानगी मागितली आहे. यावर प्रशासन काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्हा प्रशासनाने सुद्धा या अर्जाला गांभीर्याने घेत त्याबाबत नेमकी काय कारवाई सुरु आहे, याची माहिती अर्जदारास कळविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार (नझूल) के.डी. मेश्राम यांनी संबंधित अर्जदाराला पत्रपाठवून कळविले आहे की, कस्तुरचंद पार्क येथे हेलिकॉप्टर लॅँड करण्यासाठी परवानगी देण्याबाबतचा आपला अर्ज कार्यालयात प्राप्त झाला आहे. सदर परवानगीसाठी हेरिटेज संवर्धन समिती नागपूर शहर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १, पोलीस उपायुक्त (वाहतूक) नागपूर शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सदर आणि मुख्य अग्निशामक अधिकारी महानगरपालिका नागपूर या विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. त्याकरिता या कार्यालयाकडून पत्राद्वारे पाठपुरावा करण्यात येईल, तरीपण आपणसुद्धा संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे कळविले आहे.

टॅग्स :Helicopter Eelaहेलिकॉप्टर ईलाElectionनिवडणूक