शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सदस्यांच्या प्रश्नावरकधी होणार चर्चा ?

By admin | Updated: September 17, 2015 03:54 IST

नगरसेवकांना नागरिकांच्या समस्या सोडविता याव्यात यासाठी त्यांना महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार सभागृहात प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आहे.

नागपूर : नगरसेवकांना नागरिकांच्या समस्या सोडविता याव्यात यासाठी त्यांना महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार सभागृहात प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आहे. परंतु सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर चर्चा होईलच याची शाश्वती नाही. गेल्या अडीच -तीन महिन्यापासून ३४ प्रश्न प्रलंबित आहेत. यावर चर्चा कधी होणार, असा प्रश्न सदस्यांना पडला आहे. मनपा कायद्यानुसार सदस्यांनी प्रशासनाला विचारलेल्या प्रश्नावर सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा होणे अपेक्षित असते. परंतु अनेकदा प्रश्नोत्तराचा तास होत नाही. कधीकधी एखाद्या प्रश्नावरील चर्चा लांबते. त्यामुळे इतर प्रश्नांना न्याय मिळत नाही. तसेच सभागृह तहकूब झाले की, सदस्यांचे प्रश्न प्रलंबित राहतात. त्यामुळे उपस्थित केलेल्या प्रश्नांना न्याय मिळत नसल्याची व्यथा सदस्यांनी मांडली. २३ सप्टेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजात २० जूनच्या सभेतील प्रलंबित ११ प्रश्न, २० जुलैच्या सभेतील १९ तसेच १७ आॅगस्टच्या सर्वसाधारण सभेतील प्रलंबित ४ प्रश्नाचा समावेश करण्यात आला आहे. नियमानुसार सभेच्या कामकाजात सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा समावेश केला जातो. परंतु त्यावर चर्चा होत नसल्याने अनेक सदस्य सभागृहात प्रश्न उपस्थित करीत नसल्याचे चित्र आहे. २० जूनच्या सभेत सदस्यांनी नोटीस न देता हटविण्यात आलेले सीताबर्डी भागातील व्यापाऱ्यांचे अतिक्रमण, २०१४-२०१५ या वर्षात मनपाने किती झाडे लावली, त्यातील किती जिवंत आहेत. काचीपुरा येथील कृषी विद्यापीठाच्या जागेवरील लॉन किंवा बांधकाम अधिकृत आहे का. मनपामध्ये किती शिक्षणाधिकारी आहेत. सार्वजनिक रस्त्यावरील मंदिर, मशीद, बौद्धविहार तोडण्यासंदर्भात कोणते आदेश आहेत, अशा महत्त्वाच्या प्रश्नावर अद्याप चर्चा झालेली नाही. महत्त्वाच्या २० जुलैच्या सभेत सदस्यांनी उपस्थित केलेले १९ प्रश्न प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)