शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कॉटन मार्केट नेहमीसाठीच बंद होणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 19:29 IST

१०० वर्षे जुना कॉटन मार्केट भाजी बाजार प्रशासन नेहमीसाठी बंद करणार काय, असा सवाल व्यापारी आणि अडतियांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : निर्जंतुकीकरणाच्या नावाखाली २८ मार्चला कॉटन मार्केट भाजी बाजार बंद केला. बाजार १ एप्रिलपासून सुरू करण्याची माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महात्मा फुले सब्जी व फ्रूट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत दिली होती. पण गर्दीचे कारण देत जवळपास २० दिवसानंतरही बाजार सुरू केला नाही. १०० वर्षे जुना कॉटन मार्केट भाजी बाजार प्रशासन नेहमीसाठी बंद करणार काय, असा सवाल व्यापारी आणि अडतियांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.कॉटन मार्केट आज ना उद्या सुरू होण्याच्या अपेक्षेने शेतकरी आपापल्या गावातून दररोज भाजीपाला विक्रीसाठी आणायचे. पण या ठिकाणी विक्री होत नसल्याने शहरातील अन्य बाजारात कमी भावात विक्री करून मोकळे व्हायचे. या व्यवहारात त्यांना दररोज आर्थिक फटका बसला. तीन दिवसापूर्वी कॉटन मार्केटच्या प्रवेशद्वारावरूनच शेतकऱ्यांना परत पाठविले. या शेतकºयांनी रस्त्याच्या कडेला बसून भाज्या विकल्या आणि गावाकडे परतले. याशिवाय कॉटन मार्केटमधील व्यापारी आणि अडतियांची शहरातील आठ बाजारात व्यवस्था केली आहे. एका अडतियाला दोन शेतकºयांच्या गाड्यामधील भाज्या विकण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे चार बाजार वगळता अन्य चार बाजारात शेतकºयांच्या भाज्यांची विक्री होत नाही. या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी, व्यापारी आणि अडतिया अडचणीत आहेत. यातच कॉटन मार्केट बाजार सुरू न केल्याने त्यांची चिंता वाढली आहे.जवळपास सात वर्षांपूर्वी कॉटन मार्केटमधील अडतियांना कळमना भाजी बाजारात स्थलांतरित केले तेव्हा येथील ३९ अडतिया कळमन्यात गेले नव्हते. तेव्हापासून ते याच बाजारात कार्यरत आहेत. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीने कॉटन मार्केटची संलग्नता काढली. त्यानंतर या बाजाराचे संचालन मनपा करीत आहे. संत्रा मार्केट ते कॉटन मार्केट चौकापर्यंत जवळपास २२ ते २३ एकर जागा आहे. ही जागा महामेट्रोला विस्तारीकरणासाठी हवी आहे. याकरिता महामेट्रोचे प्रशासन आणि मनपाचे अधिकारी पाठपुरावा करीत आहेत. पण येथील व्यापारी याचा विरोध करीत आहेत. महामेट्रोला ही जागा ताब्यात घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत आहे. पण आता कोरोनामुळे कॉटन मार्केट बंद झाल्याने जागा ताब्यात घेण्याची संधी प्रशासनाला मिळाली आहे. सर्व व्यापारी आणि अडतियांना कळमन्यात हलवून प्रशासन जागा ताब्यात घेणार आहे. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीने अडतियांना जागा देण्याची तयारी चालविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :Cotton Market, Nagpurकॉटन मार्केट