शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीव सप्ताह विशेष; वन्यजीवांवरील डाक तिकिटांची संग्राहक कीर्ती दुबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 16:13 IST

postage stamp, Wild Life कीर्तीच्या वन्यजीवांवरील डाक तिकिटांच्या संग्रहात पंधराशेवर डाक तिकिटांचा समावेश आहे. ४८ प्रकारच्या थीममध्ये तिने हा संग्रह केला आहे.

ठळक मुद्देविविध देशांनी वन्यजीवांवर काढलेल्या डाक तिकिटांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामान्य माणसासारखे डाक विभागालाही वन्यजीवांचे आकर्षण आहे. याची प्रचिती डाक विभागाने वन्यजीवांवर काढलेल्या डाक तिकिटांवरून येते. भारतीय पोस्टल सेवाच नाही तर इतर देशातील पोस्टल सेवेनेसुद्धा वन्यजीवांप्रती दाखविलेली आत्मीयता त्यांच्यावर काढलेल्या डाक तिकिटांवरून येते. डाक विभागाचे वन्यजीवांवरील प्रेम अनुभवायचे असेल तर कीर्ती दुबेचा संग्रह नक्कीच बघण्याची गरज आहे. वनविभाग १ ऑक्टोबरपासून वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करते. त्यानिमित्त कीर्तीच्या वन्यजीवांवरील डाक तिकिटांच्या संग्रहाचा घेतलेला आढावा.कीर्तीच्या वन्यजीवांवरील डाक तिकिटांच्या संग्रहात पंधराशेवर डाक तिकिटांचा समावेश आहे. ४८ प्रकारच्या थीममध्ये तिने हा संग्रह केला आहे.

२०१५ पासून कीर्ती हा संग्रह करीत आहे. तिच्या या संग्रहाचे दोन वेळा प्रदर्शन लागले आहे. बी.कॉमच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी असलेली कीर्ती उत्तम अ‍ॅथलिट आहे. असिस्ट वर्ल्ड रेकॉर्डने तिच्या वन्यजीवांवरील तिकीट संग्रहाची दखल घेतली आहे. कीर्तीच्या डाक तिकिटांमध्ये वनांमधील सर्वच प्राणी, पक्षी, साप, कीटक, फुलपाखरे यांचा समावेश आहे. भारताबरोबरच बहुतांश देशांनी वन्यजीवांवर काढलेली डाक तिकिटेही तिच्या संग्रहात बघायला मिळतात. वन्यजीव सप्ताहानिमित्त तिचा हा संग्रह वन्यजीव प्रेमींसाठी कुतूहलाचा विषय आहे.- संग्रहातील काही वैशिष्ट्ये१) वनविभागाला १०० वर्षे झाली असताना १९६१ मध्ये काढलेले डाक तिकीट.२) जिम कार्बेट पार्कला १०० वर्षे झाल्यानिमित्त १९७६ मध्ये काढलेले डाक तिकीट.३) इंडिया-ऑफ्रिका फोरम समिटनिमित्त गोल्डन टच असलेले इम्बॉक केलेले डाक तिकीट.४) पेंच राष्ट्रीय अभयारण्यावर काढलेले फर्स्ट डे कव्हर.५) नामिबिया देशाने विंचवावर काढलेले डाक तिकीट.६) भरतपूर पक्षी अभयारण्यावर १९७५ मध्ये काढलेले डाक तिकीट.७) श्रीलंकेने पक्ष्यांवर काढलेली मिनिटरशिट.८) पेंग्विनवर काढलेली मिनिटरशिटडाक तिकीट गोळा करण्याचा माझा छंद आहे. या संग्रहात काहीतरी वेगळेपण असावे, यासाठी वन्यजीवांवरील डाक तिकिटांचा संग्रह केला. अनेकांना तो आवडला आहे.कीर्ती मधुप्रसाद दुबे, संग्राहक

 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसartकला